Cooperative Election : लोकसभा झाली आता गावपातळीवरचं राजकारण तापणारं, ९१ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीमुळे जिल्हा पातळीवर तापलेले राजकारण पुन्हा एकदा गावपातळीवर तापणार आहे.
Cooperative Election
Cooperative Electionagrowon

Cooperative Societies Election : लोकसभा निवडणुकीमुळे थांबलेल्या सहकारातील संस्थांच्‍या निवडणुकांची धामधूम आता पुढील महिन्यात दिसणार आहे. ग्रामीण भागातील राजकारण आता सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून ढवळून निघणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २९१ विविध संस्था, सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊनही थांबला होता.

साधारण चार जूनला लोकसभा मतदानाची मोजणी झाल्यानंतर या सर्व निवडणुकांचा ‘जैसे थे’ असलेला कार्यक्रम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारातील निवडणुकांचे बिगुल वाजले होते. काही ठिकाणी माघार घेण्यापर्यंत निवडणूक कार्यक्रम पोहचला होता. काही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जाहीर झाली होती. काही ठिकाणी मतदार यादी जाहीर करण्याचे नियोजन झाले होते.

मात्र लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि या सर्व निवडणुकांची धामधूम ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सहकारातील २९१ संस्था, सेवा सोसायट्यासंह इतर निवडणुका थांबल्या होत्या. २८ फेब्रुवारी २०२४ पासून पुढे निवडणूक कार्यक्रम थांबले. त्याचवेळी ३१ मे २०२४ पर्यंत हे कार्यक्रम थांबविण्यात आल्याचे सहकार विभागातून सांगण्यात आले.

Cooperative Election
Tulsi Dam Kolhapur : ‘तुळशी’ धरणातील पाणीसाठा ४४ टक्के; पाणी नियोजनासाठी प्रशासनाची कसरत

जिल्ह्यातील अ, ब, क, ड वर्गवारीत ‘अ’ वर्गातील म्हणजे साखर कारखाने, बॅंका अशा कोणत्याही अती महत्त्वाच्या संस्थांची निवडणूक थांबलेली नाही; मात्र ‘ब’ वर्गवारीतील ८७ संस्थांची निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन थांबली. तसेच ‘क’ वर्गवारीतील ७८ संस्थांची निवडणूक ‘जैसे थे’ आहे आणि सर्वाधिक म्हणजे ‘ड’ वर्गवारीतील १२६ संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या थांबला आहे.

गावपातळीवर राजकारण तापणार

लोकसभा निवडणुकीमुळे जिल्हा पातळीवर तापलेले राजकारण पुन्हा एकदा गावपातळीवर तापणार आहे. जून महिना पावसाळ्याचा असल्यामुळे या काळात या निवडणुकांचा कार्यक्रम राबविला जाणार की, पुन्हा पुढे जाणार अशीही शंका आता उपस्थित होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com