Indrayani River : पुन्हा फेसाळली इंद्रायणी नदी!, नदीत सोडले रसायनयुक्त पाणी

Chemical Water In Indrayani River : कोल्हापुरमधील पंचगंगा नदीत मृत माशांचा खच पडल्याची घटना ताजी असतानाच आता इंद्रायणी नदी पुन्हा एकदा रसायनयुक्त पाणी सोडल्याने फेसाळली आहे. याप्रकरणी मनपा प्रशासनाने कारवाई करत एकावर गुन्हा दाखल केला आहे.
Indrayani River : पुन्हा फेसाळली इंद्रायणी नदी!, नदीत सोडले रसायनयुक्त पाणी

Pune News : राज्यातील नद्यांच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत प्रदूषित पाणी आल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले. यामुळे नदी काठावर मृत माशांचा खच पडला आहे. ही घटना शिरोळ येथील पंचगंगा नदीत पात्रात उघडकीस आली असून जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यादरम्यानच वारकऱ्यांसाठी महत्वाची असणाऱ्या इंद्रायणी नदीत पुन्हा एकदा रसायनयुक्त पाणी सोडल्याचे समोर आले आहे. यावरून मनपा प्रशासनाने एका भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे.

इंद्रायणी नदीचा उगमा पासून जवळच असणाऱ्या पुण्याच्या आळंदी परिसरातून वाहते. इंद्रायणी नदी पुण्यातून तब्बल १९ किलोमीटरच्या पट्ट्यात वाहते. ही पिंपरी-चिंचवड शहरातूनही जाते. यादरम्यान गावांमधील मैलायुक्त पाणी, शहरातील अनेक औद्योगिक वसाहती आणि कारखान्यातील रसायनयुक्त पाणी कोणत्याही प्रक्रिया विना थेट नदी पात्रात सोडले जाते. यामुळे नदीतील पाणी प्रदुषित होत आहे.

Indrayani River : पुन्हा फेसाळली इंद्रायणी नदी!, नदीत सोडले रसायनयुक्त पाणी
Panchganga River : पंगगंगा नदीची झाली गटारगंगा; मृत माशांचा खच, जलपर्णीचा विळखा

यादरम्यान गेल्या तीन दिवसापासून रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याने पुन्हा एकदा नदीतील पाण्याच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील कुदळवाडी परिसरात रेहान एंटरप्रायजेस नावाने भंगारचे गोदाम आहे. या गोदामातून रसायनयुक्त हिरवे लाल रंगाचे सांडपाणी इंद्रायणी नदीत थेट मिसळत आहे.

यामुळे नदीतील पाणी प्रदुषित होत असून जलचरांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच येथे प्रदुषण वाढत असल्याने जलप्रणीचा विळखा अधिक घट्ट होत आहे. यावरून जाधववाडीतील भंगार व्यावसायिक अब्दुलमलीक अब्दुलजब्बार खान यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Indrayani River : पुन्हा फेसाळली इंद्रायणी नदी!, नदीत सोडले रसायनयुक्त पाणी
Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’ला प्रदूषणाचा विळखा

दरम्यान गोदामातून सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त हिरवे लाल रंगाच्या सांडपाण्याची पाहणी महापालिकेकडून करण्यात आली आहे. तसेच योग्य खातरजमा केल्यानंतर भंगार गोदाम सील केले आहे.

लाखो वारकऱ्यांसह ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

इंद्रायणी नदी लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेने स्नान असून वारीत वारकरी इंद्रायणीत स्नान करतात. पण आता नदीची प्रदुषणामुळे अवस्था बिगट झाली असून लाखो वारकऱ्यांसह आळंदीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आरोग्य विभागाचे लक्ष इंद्रायणी नदीचे प्रदुषण वाढत असून नदी पात्रात रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्यांवर प्रशासनाच्या आरोग्य विभागाचे लक्ष आहे. तर प्रदुषणास कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्त्तींवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जात असून आता इंद्रायणी नदी रसायनयुक्त पाणी सोडण्यावरून एका भंगार विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

- हरविंदरसिंग बन्सल, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com