Rabi Sowing Sangli agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : मालेगावला रब्बीच्या ८० टक्के पेरण्या

Rabi Season : यंदाच्या परतीच्या पावसाचा तडाख्याने रब्बीच्या पेरण्या सर्वत्र उशिराने झाल्या.

Team Agrowon

Nashik News : मालेगाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांसाठी १२ हजार ७७५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यंदाच्या परतीच्या पावसाचा तडाख्याने रब्बीच्या पेरण्या सर्वत्र उशिराने झाल्या. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात १० हजार १४३ हेक्टरवर ७९.४० टक्के पेरण्या झाल्या.

यामध्ये गहू, मका, ज्वारी व हरभरा यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच काळात एक हजार ५६८ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. यावेळी ५,५३० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ४,५२४ हेक्टरवर (८१.८१ टक्के) गव्हाची पेरणी झाली आहे.

गेल्या वर्षी अवघी ७२८ हेक्टरवर अर्थात १३ टक्के गव्हाची पेरणी झाली होती.यंदा समाधानकारक पावस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी ९८ हजार ५३२ हेक्टरवर खरिपाची लागवड केली होती.

कृषी विभागाने रब्बीसाठी १२ हजार ७७५ हेक्टरचे उद्दिष्ट निर्धारित केले होते. तालुक्यात ऑक्टोबर महिन्यापासून रब्बीची लागवड सुरू झाली आहे. काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला होता. शेतात पाणी साचल्याने रब्बीच्या लागवडीला साधारण दोन ते तीन आठवडे उशिराने सुरवात झाली.

शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला वेग दिला आहे, गव्हाची चार हजार ५२४ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. त्या खालोखाल शेतकऱ्यांनी मका पिकाला प्राधान्य दिले आहे. सर्वसाधारण दोन हजार हेक्टर क्षेत्रापैकी एक हजार १२० हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी मकाची लागवड केली आहे. गेल्या वर्षी १०२ हेक्टरवर मका लागवड करण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT