
Buldana News : सिंचनाच्या सुविधा असलेल्या या तालुक्यात रब्बी हंगामात गव्हासोबतच मक्याचीही लागवड झाली आहे. शिवाय हरभरा या प्रमुख पिकाची लागवड चार हजार हेक्टरवर पोहोचली असल्याने आतापर्यंत सुमारे आठ हजार हेक्टरपर्यंत रब्बी लागवड क्षेत्र पोचले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे यांनी दिली.
या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गव्हाच्या पिकासोबतच मक्यावरही विश्वास दर्शवला आहे. तालुक्यात सुमारे १४१५ हेक्टरवर गहू, तर १३०० हेक्टरपर्यंत मका लागवड झाली आहे. अद्याप या दोन्ही पिकांच्या लागवडीचे काम सुरू असल्याने या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
रब्बीत हरभऱ्याचे पीक तालुक्यात मुख्य असून आतापर्यंत ४०७२ हेक्टरपर्यंत लागवड झाली. यात जळगाव महसूल मंडलात ९०२, आसलगाव ८६७, पिंपळगाव काळे ६६७, वडशिंगी ९०३, जामोद ७३३ हेक्टरवर झाली आहे.
रब्बीत ज्वारीची लागवडही यंदा ११४ हेक्टरवर झाली आहे. तालुक्यात या वर्षात जोरदार पाऊस झाला होता. परिणामी, जमिनीतील पाणी पातळी वाढलेली आहे. विहिरींना पाणी असून त्याचा उपयोग रब्बी पिकांसाठी शेतकरी करणार आहेत. अद्याप काही ठिकाणी पिकांची लागवड होत असून तालुक्याचे रब्बी क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जामोद मंडलात भुईमुगाची लागवड
तालुक्यात जामोद मंडलात दरवर्षी भुईमुगाची लागवड होत असते. आतापर्यंत या तालुक्यात २०९ हेक्टरवर भुईमूग लागवड झाली. जळगाव महसूल मंडलातही २० हेक्टरपर्यंत भुईमूग पेरणी झाली.
कांद्याला पसंती...
तालुक्यात कांद्याचे पीक बरेच शेतकरी घेत असतात. सर्वच महसूल मंडलात पेरणी केल्या जाते. आतापर्यंत जळगाव जामोद मंडलात १०९, आसलगाव १४५, पिंपळगाव काळे ९६, वडशिंगी १४१ आणि जामोदमध्ये २१९ हेक्टरवर पेरणी पोहोचली. तालुक्यात मिरचीची लागवडीलाही शेतकरी पसंती देतात. आतापर्यंत ७१ हेक्टरपर्यंत लागवड झाल्याची नोंद कृषी खात्यात झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.