E Peek Pahani  Agrowon
ॲग्रो विशेष

E Peek Pahani : लोहारा तालुक्यात ७८ टक्के ई-पीकपाहणी

Kharif Season : आतापर्यंत ७८.२९ टक्के शकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे अद्यापही जवळपास २२ टक्के शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पीक पाहणी केली नाही.

Team Agrowon

Latest Agriculture News : अवर्षण, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती आदींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शासन अनुदान, पीकविम्यापासून वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी करून घेणे आवश्यक आहे.

आतापर्यंत ७८.२९ टक्के शकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे अद्यापही जवळपास २२ टक्के शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पीक पाहणी केली नाही. नसल्याचे महसूल प्रशासनाच्या अहवालातून उघड झाले आहे.

तालुक्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे तब्बल एक महिन्यानंतर खरिपाची पेरणी झाली खरी पण मोठा पाऊस काही झाला नाही. मात्र ऐन मोसमाच्या काळात पावसाने तब्बल २८ दिवस उघडीप दिल्याने बहुतांश हलक्या जमिनीवरील पिके करपली. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शासन अनुदान देते.

त्यासाठी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार दोन महिन्यापासून ई-पीक पाहणीस सुरवात झाली. शासनाने नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना मुदतीच्या आत ई-पीक पाहणी नोंदणी करता आली नाही.

तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची अद्यापही ई - पीक पाहणी झाली नाही. बाब लक्षात घेत, प्रशासनाकडून १५ ऑक्टोबरपर्यंत ई-पीक पाहणी मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ मिळाली असल्याने या मुदतवाढीचा फायदा घेत शेतकरी आपल्या पिकांची ई-पाहणी करतील अशी आशा प्रशासनाला आहे. ई-पीक पाहणीची वेळेत नोंद न केलेले शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT