E Peek Pahani : खरीप ई-पिकांची नोंदणी करण्यास उरले दहा दिवस

Kharif Season : खरीप हंगामात मॉन्सूनचे आगमन उशिराने झाले आहे. त्यातच पूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
E Peek Pahani
E Peek Pahani Agrowon
Published on
Updated on

Pune News : खरीप हंगामात मॉन्सूनचे आगमन उशिराने झाले आहे. त्यातच पूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ई-पीकमध्ये नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना नैसर्गिक पीक विमा योजनेचा लाभ मिळणे शक्य होणार आहे. त्यामुळे नोंदणी करण्यास अखेरचे दहा दिवस उरले आहेत. शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

पंतप्रधान पीकविमा योजना व नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोबाइल अॅपद्वारे १५ ऑक्टोबरपर्यंत ई-पीकपाहणी करून घेणे गरजेचे आहे. शेतातील पिकांची माहिती ऑनलाइन नोंदविण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने ई-पीकपाहणीचा उपक्रम सुरू केला आहे.

E Peek Pahani
E Peek Pahani : नांदेड जिल्ह्यात केवळ १६ टक्के क्षेत्राचीच ई-पीकपाहणी

यामुळे शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी, अर्थात पिकाची सातबारा उताऱ्यावर नोंद करणे सोपे झाले आहे. शेतकऱ्यांना मोबाइल अॅपवर शेतातील पिकांची नोंदणी करता येत आहे. आतापर्यंत खरिपात पेरणी झालेल्या एकूण क्षेत्राची नोंद होणे अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात ई- पीकपाहणी करणे प्रलंबित आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास व ई-पीकपाहणीची नोंद असल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अचूक व लवकर मिळते. पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभागामुळे कृषी पतपुरवठा सुलभ होतो.

E Peek Pahani
E-Peek Pahani : ई-पीकनोंदणीचा अहवाल विमा कंपनी धरणार ग्राह्य

पीकविमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होत असून, अॅपवर नोंद असल्यास सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण येत नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितले.

ई-पीक नोंदणी सुविधेमुळे होणारे फायदे

- शेतकरीनिहाय पिकांच्या नोंदी घेतल्या तर निश्‍चित पीक लक्षात येईल.

- नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळणार.

- हमीभावानुसार सबसिडी मिळण्यास मदत.

- पीकविमा योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com