E Peek Pahani : खरिपातील १ लाख हेक्टरवर ई-पीकपेरा नोंदणी बाकी

Kahrif Season : अद्याप १ लाख ९ हजार ९२८ हेक्टरवरील पिकांची तर २ लाख ३० हजार ७५३ शेतकरी खातेदारांची ई-पीकपाहणी बाकी आहे.
E Peek Pahani
E Peek Pahani Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरिपातील अंतिम पेरणी क्षेत्र ५ लाख १७ हजार ३०८ हेक्टर हेक्टर आहे. बुधवार (ता. ४) पर्यंत ३ लाख २६ हजार ४९० शेतकऱ्यांची ४ लाख ७ हजार ३८० हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी झाली आहे.

अद्याप १ लाख ९ हजार ९२८ हेक्टरवरील पिकांची तर २ लाख ३० हजार ७५३ शेतकरी खातेदारांची ई-पीकपाहणी बाकी आहे. रखडत चाललेली ई-पीकपाहणी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात शनिवारी (ता. १०) व रविवारी (ता. १) विशेष मोहीम राबविण्यात आली.

E Peek Pahani
E Peek Pahani : गडहिंग्लज तालुक्यात केवळ साडेसहा टक्केच ई-पीक नोंदणी

त्यामुळे ई-पीकपाहणी क्षेत्रात वाढ झाली असली, तरी यंदाच्या खरिपातील संपूर्ण पेरणी क्षेत्राची ई-पीकपाहणी अपूर्ण आहे. परभणी जिल्ह्यातील शेती खात्यांचे एकूण क्षेत्र ६ लाख ७ हजार ५६६ हेक्टर आहे. एकूण शेतकरी खातेदारांची संख्या ५ लाख ५७ हजार २४३ आहे.

यंदा जिल्ह्यात पावसाच्या आगमनानुसार झालेल्या पेरण्या जुलैच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत लांबल्या. त्यामुळे ई-पीकपेरा नोंदणीस विलंब झाला. ई-पीक अॅपच्या वापराबाबतच्या माहितीचा अभाव, दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी न मिळणे, सर्व्हर डाउन आदी कारणांमुळे ई-पीकपाहणीची गती संथ राहिली.

E Peek Pahani
E Peek Pahani : खरीप ई-पिकांची नोंदणी करण्यास उरले दहा दिवस

अनेक शेतकरी ई-पीकपाहणी बाबत उदासीन आहेत. त्यामुळे ई-पीकपाहणी पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावातील किमान २०० शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवून गेल्या आठवड्यात दोन दिवस विशेष मोहीम राबविली. बुधवार (ता. ४)पर्यंत ई-पीकपाहणी क्षेत्रात ३ लाख २६ हजार ४९० शेतकऱ्यांनी ४ लाख ७ हजार ३८० हेक्टरपर्यंत वाढ झाली आहे.

तालुका एकूण शेतकरी खातेदार एकूण क्षेत्र पीक पाहणी खातेदार पीक पाहणी क्षेत्र

परभणी ९८५९२ १०९८९० ५३५९७ ७११३४

जिंतूर ९२७६५ ११९१६८ ५०९३७ ७४५००

सेलू ६१२८८ ६८६०३ ३२२१५ ४५२८७

मानवत ४०३३८ ४८१३६ २४४०३ ३३०१८

पाथरी ४५६०६ ५२९३३ ३३०६५ ४०८८८

सोनपेठ ३३२२२ ३६९५२ २२६३९ २७७२४

गंगाखेड ७३५५६ ६३१५४ ३४६७३ ३८५८९

पालम ४८८९९ ४७९६८ ३१६०६ ३२८६५

पूर्णा ६२९७७ ६०७५९ ४०३५५ ४३३७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com