Water Shortage Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Issue : मराठवाड्यातील ७७ लघुप्रकल्प कोरडे

Water Stock Update : मराठवाड्यातील ७७ लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. १६ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ३४ टक्के उपायुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील ७७ लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. १६ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ३४ टक्के उपायुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे पावसाचे लांबलेले व कमी प्रमाणात झालेले आगमन चिंता वाढवणारे आहे.

धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळेगाव आणि हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पांनी तळ गाठला आहे.

सर्व मोठ्या प्रकल्पात ३४ टक्के, मध्यम प्रकल्पात १८.५८ टक्के, लघू प्रकल्पात ९.३५ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये ३३.३७ टक्के, तेरणा, मांजरा आणि रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये २२ टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील सर्व ८७७ प्रकल्पांमध्ये केवळ २७.०३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. ६ धरणांमध्ये २५ ते ५० टक्के दरम्यान तर एका ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी १६ मध्यम प्रकल्पातील पाणी जोत्याखाली गेले आहे. ३७ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी, २० प्रकल्पांत २५ ते ५० टक्के तर २ प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे.

७७ लघुप्रकल्प कोरडे

मराठवाड्यात ७४९ लघुप्रकल्पपैकी छत्रपती संभाजीनगरमधील ७, धाराशिव ३२, बीड २६, लातूर १२ असे ७७ प्रकल्प कोरडे पडले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४७, जालना ३८, बीड ५४, लातूर ४५, धाराशिव ८०, नांदेड ३६, परभणी १४ आणि हिंगोली जिल्ह्यात १९ अशा ३३३ लघुप्रकल्पांमधील पाणी जोत्याखाली गेले आहे.

विभागात २४४ लघुप्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. ५६ लघुप्रकल्पांत २५ ते ५० टक्के, ८ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के पाणीसाठा तर केवळ एका लघुप्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असल्याचे असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात म्हटले आहे. .

प्रकल्पाचे नाव - पाणीसाठा (टक्के)

जायकवाडी - २८

येलदरी- ५६

सिद्धेश्वर- ०

माजलगाव - २०

मांजरा- २०

ऊर्ध्व पैनगंगा - ४४

निम्न तेरणा - ३१

निम्न मनार - ३३

विष्णुपुरी- ४३

निम्न दुधना - २६

सीना कोळेगाव -१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT