Water Crisis : राज्यातील ३६ धरणे ऐन पावसाळ्यात कोरडी

Water Shortage : पावसाळा सुरू होऊन जवळपास एक महिना होत आला आहे. या कालावधीत जोरदार पाऊस झालेला नाही.
Dam Water Storage
Dam Water StorageAgrowon

Pune News : पावसाळा सुरू होऊन जवळपास एक महिना होत आला आहे. या कालावधीत जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे धरणांत नवीन पाण्याची आवक सुरू झालेली नसल्याने जवळपास ३६ हून अधिक धरणे कोरडी पडली आहेत.

राज्यात २५ जुलैपर्यंत एकूण दोन हजार ९८९ प्रकल्पांमध्ये सुमारे ३१८ टीएमसी (९०१३.४८ दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच सरासरी २२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात पाव टक्क्यांनी घट झाली असल्याची स्थिती आहे.

Dam Water Storage
Economic Crisis : आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी समान उपायांवर सहमती

गेल्या वर्षी याच काळात २७.३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात मॉन्सून दाखल होत असताना अनेक ठिकाणी कमी-अधिक स्वरूपाचा पाऊस पडला.

मात्र, धरणांतील पाणीपातळीत वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. येत्या काळात मुसळधार पाऊस झाल्यास धरणांत नव्याने पाण्याची आवक सुरू होऊन पाणीपातळीत वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

मोठ्या प्रकल्पांत १५ टक्केच पाणीसाठा

राज्यात कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १३९ मोठी धरणे आहेत. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणात फारशी नवीन पाण्याची आवक झालेली नसल्याने पाणीपातळीत वाढ झालेली नाही. सध्या मोठ्या प्रकल्पांत २२९ टीएमसी म्हणजेच सरासरी २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

Dam Water Storage
Water Crisis : राज्यात ४२६ टॅंकरने पाणीपुरवठा

गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी वर्षी मोठी घट झाली आहे. यंदा अमरावती विभागातील धरणात ३२ टीएमसी म्हणजेच ३८ टक्के, औरंगाबाद विभागातील धरणांत ५१ टीएमसी म्हणजेच ३२ टक्के, पुणे विभागातील धरणांत ४०.२७ टीएमसी म्हणजेच ९ टक्के, कोकणातील धरणांत २३ टीएमसी म्हणजेच २६ टक्के, नागपूर विभागातील धरणांत ४९ टीएमसी म्हणजेच ४० टक्के, नाशिक विभागातील धरणांत ३३.७२ टीएमसी म्हणजेच २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

विभागनिहाय धरणांतील पाणीसाठा (टीमसीमध्ये)

विभाग ---संख्या --- पाणीसाठा --- टक्के

अमरावती -- २५९ --- ४७.४६ --- ३५.७७

औरंगाबाद -- ९१९ --- ६५.३६ -- २५.५१

कोकण --- १७३ --- ३७.५२ --- ३०.१६

नागपूर --- ३८३ -- ६०.३३ --- ३७.१०

नाशिक --- ५३५ -- ४८.३७ -- २३.१०

पुणे --- ७२० -- ५९.१४ -- ११.०२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com