Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : ‘उजनी’च्या पाण्यावर २२ दिवसांत ६६ लाख युनिट वीजनिर्मिती

Electricity Generation : उजनी धरण सध्या शंभर टक्क्यांवर भरले असून, धरणातील पाण्यावर वीजनिर्मितीही केली जाते.

Team Agrowon

Solapur News : उजनी धरण सध्या शंभर टक्क्यांवर भरले असून, धरणातील पाण्यावर वीजनिर्मितीही केली जाते. धरण भरल्यापासून वीजनिर्मितीसाठी रोज १६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. आता याच पाण्यावर मागच्या अवघ्या २२ दिवसात तब्बल ६६ लाख युनिट वीजेची निर्मिती झाली आहे.

उजनी धरण जुलै महिन्यात उणे पातळीतून अधिक पातळीत आलेच, पण धरणातील पाण्याने शंभर टक्क्याची पातळीही ओलांडली. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात तुलनेने त्यावेळी कमी पाऊस होता, केवळ धरणाच्या वरच्या बाजूकडील पुणे जिल्ह्याकडील धरणातील विसर्गावर धरणाने शंभर टक्क्याची पातळी गाठली.

त्यामुळे मोठा दिलासा जिल्ह्याला मिळाला. त्याचवेळी पूरनियंत्रणाच्यादृष्टीने काळजी म्हणून धरणातून वीजनिर्मितीसह उपसा योजनांना ४ ऑगस्टपासून पाणी सोडले जात होते. वीजनिर्मितासठी रोज १६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.

आता याच पाण्यावर दररोज ३ लाख युनिट (प्रतितास १२ हजार ५०० युनिट) वीजनिर्मिती होत आहे. साधारण या २२ दिवसात आतापर्यंत ६६ लाख युनिट विजेची निर्मिती या पाण्यावर झाली आहे. येथे तयार झालेली वीज महावितरणला विक्री केली जाते. आणखी किमान महिनाभर तरी वीजनिर्मिती सुरु राहील, अशी सध्याची परिस्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT