Kolhapur Rain Update agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : एनडीए येथे ६२ मिलिमीटर पाऊस

Rain News : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. गुरुवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये एनडीए येथे ६२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर दौंड, आंबेगाव तालुक्यांतही पाऊस झाल्याने खरिपासाठी पोषक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करू लागले आहे.

चार महिने उन्हाने लाही लाही होत असताना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्‍न उपस्थित राहिला झाला आहे. ऐन मेअखेरीस जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्‍न उपस्थित राहिला आहे. त्यातच हवामान विभागाने देशात १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविल्यानंतर जूनच्या सुरुवातीला वातावरणात मोठे बदल झाले आहे.

सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असल्याने उकाड्यातही वाढ होत आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरणाची स्थिती तयार होत असून पावसाला सुरुवात होत आहे.

पुणे, आंबेगाव तालुक्यांत अनेक ठिकाणी पाऊस पडला. या पावसामुळे हवेलीतील अनेक ठिकाणी झाडे पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तर आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील मेंगडेवाडी, निरगुडसर परिसरातही झालेल्या पावसामुळे ओढ्यांना पूर आले. पहिल्याच पावसात ओढ्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

दौंड तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडाक्यात मुसळधार पावसाचे जोरदार आगमन झाले. देऊळगाव राजे परिसरातील भागात शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांकडून जोरदार चालू असून, तोच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

पुणे जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

ठिकाण --- पडलेला पाऊस

वडगाव शेरी --- २०.५

शिवाजीनगर -- ९.४

कोरेगाव पार्क --- ४.५

पाषाण --- ६.६

चिंचवड --- ४.५

एनडीए -- ६२.०

लोणावळा -- ५.५

राजगुरुनगर -- २६.५

लव्हळे --- ६.५

निमगिरी --- ७.५

नारायणगाव -- १.०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT