Maharashtra Weather Update : माॅन्सूनने आज राज्यात जोरदार मुसंड मारली. शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या माॅन्सूनने शेवटी आज महाराष्ट्रात प्रवेश केला. माॅन्सून रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत पोचला. तर राज्यात पुढील ४ दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज दिला.
माॅन्सूनने आज वाटचाल करत राज्याच्या काही भागात प्रवेश केला. माॅन्सून आज राज्यातील सिंधुदूर्ग, सांगली आणि कोल्हापूर जिल्हा व्यापला आहे. तसेच रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात माॅन्सून दाखल झाला.
राज्याच्या बहुतांशी भागात पाणीटंचाई जाणवत होती. तसेच मागील हंगामातील दुष्काळी परिस्थितीनंतर शेतकरी माॅन्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. माॅन्सूनने यंदा वेळेपेक्षा आधी राज्यात येत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
माॅन्सूनने महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती केली. अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच बंगालच्या उपसागरात बहुतांशी भागात माॅन्सून पोचला. माॅन्सूनची सिमा आज रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयानगरम भागात होती.
माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये माॅन्सून महाराष्ट्राचा आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापेल असाही अंदाज आहे. तसेच तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग माॅन्सून व्यापेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही भागात पुढील ४ चार दिवस पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.