Pre-Monsoon Rains
Pre-Monsoon RainsAgrowon

Pre-Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाने विविध जिल्ह्यांना झोडपले; पिकांना फटका

Pre-Monsoon Rain Update :  राज्यातील विविध जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. 
Published on

Pune Monsoon News : देशात मॉन्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुर असतानाच राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसापासून मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे.

नांदेड न्यायालयाच्या गेटवर झाड कोसळलं

बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नांदेड आणि परिसरात दाणादाण उडवून दिली. येथे दुपारी वादळी वाऱ्यामुळे नांदेड न्यायालयाच्या गेटवर झाड कोसळले. विद्युत पारा तुडल्या. त्यामुळे न्यायालय परिसरात विद्युत पूरवठा खंडीत झाला होता. 

बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

जिल्ह्यातील विविध परिसरात बुधवारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. संग्रामपूर, खामगाव, शेगाव परिसरात पाऊस झाला. येथे वादळी वाऱ्यासह पावसाने काढणीला आलेल्या केळीच्या बागा उध्वस्त झाल्या. तसेच तसेच भाजीपाला पिकांचंही नुकसान झाल्याने शेतकरी सकंटात आला आहे.

Pre-Monsoon Rains
Pre Monsoon Rain : राज्यातील विविध भागांत पूर्वमोसमी पावसाचा जोर

सांगलीला झोडपले

सांगलीला मंगळवारी पावसाने झोडपल्यानंतर बुधवारी देखील तासगाव परिसराला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. त्यामुळे द्राक्ष बागामध्ये पाणी साचले. याच्याआधी मंगळवारी दुपारी सांगली, मिरजेसह सांगलीच्या काही भागात हलका पाऊस झाला होता.

नाशिक : शेतात पाणीच पाणी

दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या काही भागात देखील वळवाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. तर बुधवारी झालेल्या पावसामुळे शहरासह परिसरातील विविध ठिकाणी शेतात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

सातारा : ४० बकऱ्यांचा मृत्यू

साताऱ्याच्या पाचगणी वाई परिसरातील जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी दोन ठिकाणी वीज कोसळून ४० बकऱ्यांचा मृत्यू झाला. तर मुसळधार पावसामुळे वाहतूक देखील खोळंबली होती.

Pre-Monsoon Rains
Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाची पुन्हा दमदार हजेरी

लातूरच्या जळकोटमध्ये मुसळधार पाऊस

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या लातूर जिल्ह्यात देखील बुधवारी मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला. येथील जळकोट शहर तसेच परिसराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जिकडे तिकडे पाणीच पाणी करून सोडले.

जळकोट तालुक्यात बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतीला तलावाचे स्वरूप आले होते. तर चांगला पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीपूर्व मशागतीसह शेतातील कामांना लागले आहेत. तसेच उदगीर कुमठा शहर परिसरात ढगफूटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे कुमठा गावाकडे जाणारा रस्ता काही काळासाठी बंद झाला होता.

कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस

जिल्ह्यात देखील बुधवारी मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. येथे हातकणंगले, करवीर, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यामध्ये पाऊस झाला. त्यामुळे शेतीच्या कामांना गती आली असून हातकणंगले तालुक्यातील छोटी तलावं अर्ध्या तासाच्या पावसातच भरून वाहू लागली. बुधवारी दुपारनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊसाची सुरुवात झाली.

हातकणंगले तालुक्यातील वाठार, तांदूळवाडी, किनी, पेठ वडगाव या भागास जोरदार पावसाने सुमारे दोन तास झोडपून काढले. येथे काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचेही समोर आले आहे.

गडहिंग्लज परिसरात असणाऱ्या हलकर्णी येथे तीन तास जोरदार पाऊस झाल्याने ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे येथे वाहतूक खोळंबली होती. तर जिल्ह्याच्या विविध भागात पावसाला चांगली सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com