Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : नगर जिल्ह्यात रब्बीची ५४ टक्के पेरणी

Rabi Season : नगर जिल्ह्यात अजूनही रब्बी हंगामातील पेरण्याची स्थिती कमीच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५४ टक्के पेरणी झाली आहे. पुरेसे पाणी नसल्याने यंदा गव्हाचे पेरणीक्षेत्र कमीच राहण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात अजूनही रब्बी हंगामातील पेरण्याची स्थिती कमीच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५४ टक्के पेरणी झाली आहे. पुरेसे पाणी नसल्याने यंदा गव्हाचे पेरणीक्षेत्र कमीच राहण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात रब्बीत ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातील आतापर्यंत २ लाख ४९ हजार ५२० हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा खरिपातही पुरेसा पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान झाले.

दरवर्षी परतीचा पाऊस असल्याने दिवाळीनंतर पेरण्याचे क्षेत्र वाढत असते. यंदा मात्र परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पेरण्याला फार वेग आला नाही. यंदा अनेक भागांत पुरेसे पाणी नसल्याने गहू, हरभरा, कांदा या पिकांचे क्षेत्र फारसे वाढताना दिसत नाही.

आतापर्यंत झालेल्या पेरणीत ज्वारीची १ लाख ५१ हजार ९७७ म्हणजे ५६.७४ टक्के, गव्हाची ४१ हजार ८२५ म्हणजे ४८.४१ टक्के, मक्याची १६ हजार २९९ म्हणजे ११५.४५ टक्के, हरभऱ्याची ३९ हजार १२६ हेक्टर म्हणजे ४४.२७ टक्के,

तर सूर्यफूल, करडई, जवस, तीळ आदी गळीत धान्याची केवळ ३७.८२ टक्के म्हणजे १८३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा रब्बीत सरासरी एवढीही पेरणी होत नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT