Yavatmal News : यंदा जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यातील एक लाख २५ हजार हेक्टरवर हरभरा पेरणी होणार आहे. जवळपास ६० हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागाने रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. त्यामुळे प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झालेला आहे. खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी हंगामावरच आहे. खरीप हंगामातील खर्च रब्बीत भरून काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
कृषी विभागाने रब्बी हंगामाचे नियोजन केलेले आहे. दोन लाख हेक्टरवर रब्बी हंगामाची लागवड होण्याचा अंदाज आहे. त्यात हरभरा एक लाख २५ हजार हेक्टरवर, गहू ६० हजार, ज्वारीची दोन हजार ५०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.
सार्वजनिक व खासगी मिळून हरभऱ्याचे बियाणे, गहू बियाणे उपलब्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेरणीला वेग आलेला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झालेली असून, पाच हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाल्याचा अंदाज आहे. हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक असून, गव्हाचे क्षेत्र घटण्याचा अंदाज आहे.
युरिया खताची अडचण
रब्बी हंगामात पेरा वाढणार आहे. कृषी सेवा केंद्रात बियाणे उपलब्ध आहेत. यंदा युरिया खताची अडचण शेतकऱ्यांना भेडसावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आताच युरिया खतासाठी शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. म्हणून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.