Nashik APMC
Nashik APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Market Committee Election : नाशिक बाजार समिती निवडणुकीत आता २२३ जागांसाठी ५३७ उमेदवार रिंगणात

Team Agrowon

Nashik News : राज्यात भाजपविरोधात माहविकास आघाडीने (Mahvikas Aghadi) वज्रमूठ बांधली आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘मविआ’मध्ये बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) अनेक बाजार समित्यांमध्ये गटा-गटात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्या तुलनेत शिंदे गट आणि भाजपने एकसंघ राहत तुल्यबळ पॅनेल उतरवले आहे.

माघारीदरम्यान, अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्या. जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमध्ये गुरुवारी (ता. २०) माघारीनंतर २२३ जागांसाठी ५३७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. २२७७ पैकी १५९८ उमेदवारांनी माघार घेतली.

बाजार समित्यांच्या रणधुमाळीत १४ समित्यांमधील २५२ जागांसाठी विक्रमी २४२० अर्ज प्राप्त झाले होते. यात सोसायटी गटात १४६१, ग्रामपंचायत गटात ६७८, व्यापारी गटात १८३, हमाल-मापारी गटातील ९८ अर्जांचा समावेश होता.

छाननीनंतर २२७७ उमेदवार रिंगणात होते. यापैकी गुरुवारी १५९८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ५३७ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीनंतर साधारण सर्व बाजार समित्यांमध्ये नेत्यांनी पॅनेलची घोषणा केली. बहुतांश समित्यांमध्ये दुरंगी लढती होत आहेत.

भाजपविरोधात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ‘मविआ’ विरुद्ध शिंदे गट-भाजप अशी लढत मानली जात होती. प्रत्यक्षात, ‘मविआ’तील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना गटागटांत विभागली गेली.

सुरगाण्यात १८ जागा बिनविरोध असून, जिल्ह्यात बिनविरोध निवडणूक होणारी ही एकमेव बाजार समिती ठरली आहे. येथे माकपप्रणीत किसान विकास प्रगती पॅनेलचे वर्चस्व सुरगाणा बाजार समितीवर प्रस्थापित झाले आहे.

देवळ्यात बिनविरोध निवडीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. १८ पैकी आठ जागा बिनविरोध झाल्या असून, दहा जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. नाशिकच्या व्यापारी व हमाल गटातील ३ उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

बाजार समितीनिहाय उमेदवारीची स्थिती

बाजार समिती- दाखल अर्ज - माघार अर्ज- रिंगणातील उमेदवार

नांदगाव- ११७- ७७- ४०

चांदवड - १६१- ११७- ४४

नाशिक (१५ जागांसाठी)- १३७ - ९७- ४०

मनमाड - १२५- ८४- ४१

कळवण १३२- ९०- ४०

पिंपळगाव-बसवंत - २६८- २२७- ४१

देवळा (१० जागांसाठी) - १२९- १०३- १८

मालेगाव - २०२- १५६- ४६

घोटी - १४४- १०१- ४३

येवला- २१७ - १६९ --४८

सिन्नर - १६९- १२४- ४५

दिंडोरी- १४९- १०७- ४२

लासलगाव- २१०- १४६- ४९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT