Dharashiv News: मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील किमान तापमानात जवळपास पाच अंश सेल्सिअसची वाढ होऊन ते १५ अंशांपर्यंत गेले आहे. तसेच शनिवारपासून ढगाळ हवामान निर्माण झालेले आहे. त्यामुळे हरभरा पिकावर घाटे अळी, तर तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळी, शेंग माशीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे पिकांवर शिफारशीत किटकनाशकांची फवारणी घ्यावी. तापमानवाढीमुळे पिकांना फटका बसू नये, यासाठी पाणीव्यवस्थापन करावे, असा सल्ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी दिला आहे..ढगाळ हवामान आणि तापमान वाढल्याने दव कमी झाले आहेत. उष्णता वाढल्यामुळे पिकांना फटका बसतो. असे वातावरण हरभऱ्यावरील घाटेअळीच्या प्रादुर्भावस पोषक असल्याने धोका पोचतो. ज्वारी पिकावर फारसा परिणाम होणार नाही. लवकर पेरलेल्या ज्वारीवर लष्करी अळीचा काहीसा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, असेही डॉ. डाखोरे यांनी सांगितले..Chana Diseases: मर रोगाचा धोका वाढतोय! हरभरा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स?.तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व शेंग माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अळीची आर्थिक नुकसानीची पातळी कळण्यासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतामध्ये इंग्रजी टी आकाराचे पक्षी थांबे लावावेत. शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४.४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ टक्के ३ मिली किंवा इंडाक्झाकार्ब १४.५ टक्के आठ मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५ टक्के तीन मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ८ मिलि किंवा ल्युफेन्यूरॉन ५.४ टक्के १२ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला..Tur Disease Management : तूर पिकावरील करपा, वांझ रोगाचे व्यवस्थापन .हरभरा पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास ५ टक्के (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी, अशी माहिती डॉ. डाखोरे यांनी दिली..संत्रा, मोसंबी बागेत आंतरमशागत करावीमृग बहार संत्रा, मोसंबी बागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी जिब्रॅलिक अॅसिड एक ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी तसेच अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी चिलेटेड झिंक ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा, मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, असा सल्ला डॉ. डाखोरे यांनी दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.