Jalgaon APMC Election : जळगावात शिंदे गट-भाजपचे पॅनेल निश्चित

Jalgaon Bajar Samiti : जळगाव जिल्ह्यात चर्चेत असलेल्या जळगाव बाजार समितीसाठी युती किंवा शिंदे गट आणि भाजपचे पॅनेल जवळपास निश्चित झाले आहे.
Shinde $ Fadanvis
Shinde $ FadanvisAgrowon
Published on
Updated on

Jalgaon Market Committee : जळगाव जिल्ह्यात चर्चेत असलेल्या जळगाव बाजार समितीसाठी युती किंवा शिंदे गट आणि भाजपचे पॅनेल जवळपास निश्चित झाले आहे. त्यातच भाजप (BJP) व शिंदे गटाची (Shinde Group) एका जागेवरून रस्सीखेच सुरूच होती.

यात भाजपने बाजी मारली असून, सातव्या जागेवरही भाजपचा उमेदवार असणार आहे. अर्थात आता भाजपला सात व शिंदे गटाला ११ जागांवर लढावे लागेल.

यात भाजपच्या उमेदवारांबाबतही अंतिम कार्यवाही झाल्याची माहिती आहे. त्यात काही जणांची नावेही निश्चित झाली असून, संभाव्य प्रभाकर सोनवणे, मिलिंद चौधरी यांच्या नावांची चर्चा आहेत.

तर शिंदे गटातर्फे राजेंद्र चव्हाण, सुरेश श्यामराव सोनवणे, वसंत भालेराव, अर्जुन गजमल पाटील, नारखेडे, बापू महाजन यांच्या नावांची चर्चा आहे. इतर उमेदवारांची नावेही लवकरच निश्चित होतील, अशी माहिती मिळाली.

युतीच्या उमेदवारांनी प्रचारदेखील सुरू केला आहे. दोन्ही पॅनेलचे लवकरच शेतकरी किंवा मतदारांचे मेळावे होणार आहेत. त्याची तयारी सुरू आहे.

Shinde $ Fadanvis
Jalgaon Market Committee Election Update : जळगाव बाजार समिती निवडणुकीत शिंदे गट, भाजपचा फॉर्म्यूला

इतर नावांबाबत किंवा उमेदवारांबाबत खल सुरू आहे. काही नावे पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजपतर्फे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन निश्चित करतील. सर्वच उमेदवारांची नावे जाहीर करणे दोन्ही पॅनेल किंवा युती व महाविकास आघाडीने टाळले आहे.

यामुळे पक्षात बंडखोरी किंवा धुसफूस तयार होऊ शकते. त्यामुळे काही नावे माघारीनंतरच जाहीर होतील, अशी माहिती मिळाली.

‘कोळी, गुर्जर समाजावर अन्याय करू नका’

दोन्ही पॅनेल किंवा महाविकास आघाडी आणि युतीच्या पॅनेलमध्ये जातीय समीकरणांवर काम सुरू आहे. जळगाव ग्रामीणमध्ये जेवढी मते लेवा पाटीदार समाजाची आहेत, तेवढीच गुर्जर समाजाची आहेत.

ही बाब लक्षात घेऊन गुर्जर व लेवा पाटीदार उमेदवारांची संख्या समान असावी, असा मुद्दा मतदार व काही कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. तसेच कोळी समाजातील मतदार अधिक असल्याने किमान चार उमेदवार कोळी समाजातील असावेत, असाही मुद्दा कार्यकर्त्यांच चर्चिला जात आहे.

Shinde $ Fadanvis
Nashik APMC News : निवडणुकीच्या तोंडावर माजी सभापती विरुद्ध पकड वॉरंट

आघाडीचे शेतकरी विकास पॅनेल अपूर्णच

महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनेल गठीत झाले आहे. त्यात लक्ष्मण (लकी) पाटील, श्यामकांत सोनवणे, सुनील महाजन, मनोज चौधरी, लिना महाजन, पांडुरंग पाटील, नीलेश पाटील, योगराज सपकाळे, दिलीप कोळी, जयराज चव्हाण यांची नावे निश्चित झाली आहेत. इतर नावे अद्याप निश्चित झालेली नसल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com