KVK  Agrowon
ॲग्रो विशेष

Krishi Vigyan Kendra : पहिल्या कृषी विज्ञान केंद्राला ५० वर्षे पूर्ण

Latest Agriculture News : बदलती शेतीपद्धती व आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र हे जणू ज्ञानाचे मंदिरच ठरले आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : बदलती शेतीपद्धती व आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र हे जणू ज्ञानाचे मंदिरच ठरले आहे. गेल्या ५० वर्षांपूर्वी भारतीय कृषी संशोधन परिषदेने देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र २१ मार्च १९७४ रोजी पुद्दुचेरी (तमिळनाडू) येथे स्थापन केले होते. या वाटचालीला आता ५० वर्षे पूर्ण झाली असून सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. आता देशभरात या केंद्रांचे जाळे पसरले आहे.

देशभरात कृषी विज्ञान केंद्रामार्फत आजवर शेतकऱ्यांना आधुनिक कृषी पद्धतींचे धडे दिल्याने कृषी व पूरक व्यवसायात अनेक प्रयोगशील शेतकरी घडले आहेत. सध्या कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था (अटारी)यांचे देशात ११ विभाग आहे. १९७४ साली देशात पहिले कृषी विज्ञान केंद्र पुदुच्चेरी येथे तर १९७६ साली महाराष्ट्रात पहिले केंद्र कोसबाड (जि. पालघर) या आदिवासी भागात स्थापन झाले होते. सध्या देशभरात ७३१ कृषी विज्ञान केंद्र कार्यरत असून ५४५ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक तर ९३ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २ आहेत.

शिक्षण आयोगाच्या (१९६४-६६) दरम्यानच्या शिफारशींवर आधारित नियोजन आयोग आणि आंतर-मंत्रालयीन समितीने चर्चेअंती १९७३ साली भारतीय कृषी संशोधन परिषदेने डॉ. मोहन सिंग मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमली होती. त्यानुसार कृषी विज्ञान केंद्राची संकल्पना पुढे आली. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या कृषी विज्ञान केंद्राची स्थापना २१ मार्च १९७४ साली कोईम्बतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली पुदुच्चेरी येथे स्थापना करण्यात आली होती. त्यातून पुढे केंद्राचा विस्तार देशभर टप्प्याटप्याने झाला आहे.

प्रत्येक जिल्ह्यात एक कृषी विज्ञान केंद्र

१९७४ ते २००५ या कालावधीत टप्प्याटप्याने २९० केंद्रे झाली होती. २००५ साली स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००७च्या अखेरीस देशातील प्रत्येक ग्रामीण जिल्ह्यात एक कृषी विज्ञान केंद्र स्थापनेची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य कृषी विद्यापीठे आणि केंद्रीय कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन परिषद, राज्य सरकार, अशासकीय संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व इतर शैक्षणिक संस्थांच्या अंतर्गत ते स्थापन होऊन कृषी तंत्रज्ञान विस्तारात योगदान देत आहेत.

शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यासाठी प्रयत्न : डॉ. गौतम

गेल्या ५० वर्षांत कृषी विज्ञान केंद्राच्या स्थापनेनंतर अनेक नव्या संधी शेतकऱ्यांच्या आयुष्यात निर्माण झाल्या. मात्र आता पुढील पन्नास वर्षांत अनेक आव्हाने शेती व शेतकऱ्यांसमोर आहेत. कमी होत असलेली जमीन, वातावरणीय बदल यासह ग्राहकांची पसंती बदलत आहेत.

त्यामुळे २०४७ पर्यंत विकसित भारताच्या दिशेने जाताना कृषी विस्तार, शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व सेवा या माध्यमातून त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन रुजविणार आहोत. शेतकऱ्यांना आता पारंपरिक पद्धतीने काम करणारे शेतकरी न ठेवता बदलत्या बाजारपेठेच्या अनुषंगाने त्यांना आता उद्योजक बनवणार आहोत असा विश्वास भारतीय कृषी संशोधन परिषदेचे कृषी विस्तार विभागाचे उप महासंचालक डॉ. उधम सिंग गौतम यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Forecast: गुरुवारपासून पावसाला सुरुवात होणार; राज्यात आज आणि उद्या पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Nepal Youth Protests: नेपाळ संसदेला घेराव, राष्ट्रपती भवनावर कब्जा; पंतप्रधान ओलींनी दिला राजीनामा

PM Kisan Maandhan Scheme: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार मासिक ३ हजार रुपये पेन्शन; केंद्र सरकारची आर्थिक आधार देणारी योजना!

Papaya Cultivation : पपईत पाणी निघत असल्याने चिंतेत भर

Sericulture : सोलापूर जिल्ह्यात रेशीम विभागाचे ‘रेशीम आपल्या दारी’ अभियान

SCROLL FOR NEXT