Agriculture Science Center : कृषी विज्ञान केंद्राची कार्यक्षमता वाढविण्याकरिता सूचना कराव्या

Vice Chancellor Dr. Indra Mani : कृषी विज्ञान केंद्राची कार्यक्षमता वाढविण्याकरिता सूचना कराव्या. तसेच सर्व सूचनांचे स्वागत करू, त्यांची ताबडतोब अंमलबजावणी केली जाईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.
Dr. Indra Mani
Dr. Indra Mani Agrowon
Published on
Updated on

Dharashiv News : जिल्ह्यातील सर्व सहयोगी विभागांनी, कृषी विज्ञान केंद्राची कार्यक्षमता वाढविण्याकरिता सूचना कराव्या. त्या सूचनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान बदलून त्यांच्या उत्पादनात देखील दुपटीने वाढ करता येणे शक्य होईल.अशा सर्व सूचनांचे स्वागत करू, त्यांची ताबडतोब अंमलबजावणी केली जाईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरच्या सोळाव्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीत आयोजित प्रक्षेत्र फेरी दरम्यान ते बोलत होते. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विद्यापीठ अभियंता दीपक काशाळकर

Dr. Indra Mani
Problem of Orange Area : संत्रा पट्ट्यातील समस्यांबाबत बच्चू कडूंचे शरद पवारांना साकडे

कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक वर्षा मारवाळीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. हुलसुरे, जिल्हा पशु सवर्धन अधिकारी डॉ. पुजारी व इतर सहयोग विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. व इतर शास्त्रज्ञ उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील मच्छीपालन, अंडी उबवणूक, कुक्कुटपालन शेळीपालन हे प्रयोग प्रात्यक्षिक जशास तसे शेतकऱ्यांच्या शेतावर राबवून शेतकऱ्यांचा पशुपालकांचा विश्‍वास तर द्विगुणित करावा. त्यांचे उत्पन्न वाढल्यास परिसरातील इतर शेतकरी यशस्वी शेतकऱ्यांचे अनुकरण करतील.

Dr. Indra Mani
Onion Export Ban : ‘निर्यात बंदी’ विरोधात ‘मार्केट बंदी’

कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर हे तीर्थक्षेत्र श्री तुळजाभवानी शहरालगत असल्यामुळे याला एक वेगळे महत्त्व आहे. विद्यापीठ या कृषी विज्ञान केंद्राच्या विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. येत्या दोन वर्षाच्या काळात या परिसराचा चेहरा मोहरा आपण बदलून दाखवू, असे ते म्हणाले.

वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीच्या प्रारंभी कार्यक्रम समन्वयक प्रा. वर्षा मरवाळीकर यांनी प्रास्ताविक तसेच इतर सर्व शास्त्रज्ञांनी विविध विभागांचे सादरीकरण केले. कृषी विज्ञान केंद्राच्या अतिशय जिव्हाळ्याची असणारी संरक्षक भिंतीचे भूमिपूजन डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते पार पडले. या वेळी विद्यापीठ अभियंता दीपक काशाळकर, विभागाचे दयानंद टेकाळे, गुत्तेदार बालाजी जाधव, लतीफ चौधरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com