Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांचे 'रेल रोको आंदोलन' रद्द; न्यायालयात लेखी हमीपत्र सादर
Farmer Loan Waiver : न्यायालयाने काल आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाल्याने स्वतःहून (सुमोटो) दखल घेत जनहित याचिका दाखल केली होती. तसेच काल रात्री ६ वाजेपर्यंत आंदोलनाचं मैदान मोकळे करण्याचे आदेश दिले होते. तर राज्य सरकारने चर्चेचं निमंत्रण बच्चू कडू यांना दिले. त्यावेळी राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कडू यांनी दिला होता.