Rabi Crop Loan  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Loan : रब्बीत जिल्हा बँकेकडून ५० टक्के पीककर्ज वाटप

Crop Loan Distribution : आतापर्यंत रब्बीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) उद्दिष्टाच्या ६८१ कोटी २३ लाखांपैकी ३४७ कोटी ८३ लाख २९ हजार रुपये म्हणजेच ५० टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामात चांगले उत्पादन घेण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांचा पीक कर्ज घेण्याकडे काहीसा कल वाढला आहे. आतापर्यंत रब्बीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) उद्दिष्टाच्या ६८१ कोटी २३ लाखांपैकी ३४७ कोटी ८३ लाख २९ हजार रुपये म्हणजेच ५० टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पीक कर्जामध्ये ३६ कोटी १३ लाख रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

चालू वर्षी पावसाळ्यात जास्त पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. त्यातच सप्टेंबरअखेरीस झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली असल्याने त्यावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचे नियोजन केले होते. परंतु आर्थिक अडचणी उभ्या राहिल्याने शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

रब्बी हंगामात अनेक शेतकरी पीडीसीसी बँकेकडून विविध पिकांसाठी कर्ज घेतात. गेल्या वर्षी याच काळात रब्बीत ३११ कोटी ६९ लाख ९० हजार रुपये म्हणजेच ५२ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पीककर्ज वाटपात वाढ झाली आहे.

पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या जवळपास ३०० शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १३०६ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्जाचे वाटप केले जात आहे.

तर तीन लाखांहून अधिक पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीक कर्जाचा आधार घेऊन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामाचे नियोजन करून पिके घेतात.

तालुकानिहाय रब्बीचे पीक कर्जवाटप

तालुका कर्जवाटप

आंबेगाव ७१ कोटी १५ लाख १० हजार रुपये

बारामती १० कोटी २७ लाख ५७ हजार रुपये

भोर २१ कोटी ३७ लाख ७ हजार रुपये

दौंड ७ कोटी ७ लाख ९८ हजार रुपये

हवेली ६ कोटी ८२ लाख ७ हजार रुपये

इंदापूर १९ कोटी ९ लाख ५९ हजार रुपये

जुन्नर ७२ कोटी ३९ लाख ९४ हजार रुपये

खेड ६५ कोटी ६५ लाख ३३ हजार रुपये

मावळ ११ कोटी ७९ लाख ३५ हजार रुपये

मुळशी १७ कोटी ११ लाख ६ हजार रुपये

पुरंदर ३१ कोटी ७३ लाख ७३ हजार रुपये

शिरुर ८ कोटी ३९ लाख ३९ हजार रुपये

वेल्हा ४ कोटी ९५ लाख १० हजार रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

Festival Noise Pollution: गोंगाटात हरवलेला उत्सव

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

SCROLL FOR NEXT