Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : पाटगाव प्रकल्पात ४० टक्के पाणीसाठा

Patgaon Water Project : शेकडो गावांना जीवनदायिनी ठरलेल्या पाटगावच्या मौनीसागर जलाशयात सध्या ३९.८४ टक्के पाणीसाठा आहे.

Team Agrowon

Kolhapur News : भुदरगड तालुक्यातील मध्यम व लघू प्रकल्प मे महिन्यात तळ गाठू लागले आहेत. रणरणत्या उन्हामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू लागल्याने पिण्यासह पिकांसाठी सर्वत्र पाण्याची मागणी वाढत आहे. शेकडो गावांना जीवनदायिनी ठरलेल्या पाटगावच्या मौनीसागर जलाशयात सध्या ३९.८४ टक्के पाणीसाठा आहे.

या वर्षी कडक उन्हाळा, वळीव पावसाचा अभाव यामुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत गेली. त्यामुळे सर्व प्रकल्पांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या पावसाळ्यात जून कोरडा गेला. मात्र, जुलैनंतर तालुक्यात चांगला पाऊस झाला. सर्व प्रकल्प वेळेत भरल्यामुळे पाटबंधारे विभागाला वर्षभर पाणी सोडण्याचे चांगले नियोजन करता आले. तालुक्यातील कोंडोशी, वासनोली, फये, नागणवाडी प्रकल्पांतील साठा झपाट्याने कमी होत आहे.

पाटगाव प्रकल्प उभारणीनंतर पहिल्यांदाच गतवर्षी कोरडा पडला होता. जून महिन्यात प्रकल्पात केवळ २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. यामुळे पाटगाव धरण क्षेत्रातील आठ हजार हेक्टर क्षेत्र शेतीसह शेकडो गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला होता. यामुळे पाटगाव प्रकल्पातील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेत प्रत्यक्ष पाणीवापर, पाणीटंचाई याचा विचार करून नियोजन करावे लागणार आहे.

भुदरगडमधील प्रकल्पनिहाय पाणीसाठा

पाटगाव ३९.८४ टक्के

फये २०.४० टक्के

कोंडोशी २९.८५ टक्के

पिंपळगाव-नागणवाडी ४० टक्के

झुलपेवाडी-चिकोत्रा ३५.४१ टक्के

संभाव्य पाणीटंचाईची समस्या उद्‌भवू नये यासाठी पाटबंधारे विभाग नियोजन करीत आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिली तरीही पिण्यासाठी पाणीसाठा शिल्लक राहील, असे नियोजन करीत आहोत.
दीप्ती पाटील, उपविभागीय अभियंता, भुदरगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT