Dam Water Stock : धरणांच्या पाणीपातळीत घट

Water Issue : उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होऊ लागले आहे. परिणामी, धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्याचे समोर आले आहे.
Water Stock
Water StockAgrowon

Thane News : ठाणे जिल्ह्यात मागीलवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक धरणे ओसंडून वाहू लागली होती. असे असले तरी, दुसरीकडे यंदा वातावरणातील बदलामुळे उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. तर, उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होऊ लागले आहे. परिणामी, धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाणीसाठा हा ३० ते ४० टक्क्यांच्या आसपास शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यावर पाणी कपातीची शक्यता नाकारता येत नाही.

ठाण्यासह मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा ३० ते ४० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यात भातसा धरणाचाही समावेश आहे. या धरण क्षेत्रात सध्याच्या घडीला ३४.४८ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी धरणात ३७.९० टक्के तर, २०२२ मध्ये ४३.६२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता.

Water Stock
Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा धरणात पाणीसाठा खालावला आहे. दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणी कपात लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

धरणांचा जिल्हा म्हणून ठाण्याची ओळख आहे. त्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या औद्योगिक क्षेत्रासह शहरी व ग्रामीण भागाला याच धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे पाण्याची मागणीत वाढ होत आहे.

Water Stock
Dam Water Stock : भामा आसखेड धरणामध्ये अवघा २८.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक

आर्थिक भुर्दंड

पाणीटंचाईमुळे नागरिकांना टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक ठिकाणी टँकर मागवले जात आहेत. त्यामुळे पिण्यासाठी पाण्याचा महागडा जार विकत घ्यावा लागत आहे. त्यामुळे रहिवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

धरणांतील पाणीसाठा (दलघमीमध्ये)

धरणांची नावे पाणीसाठा टक्केवारी

भातसा ३२४.८५३ ३४.४८

बारवी १२१.२८ ३५.७९

मोडक सागर २६.६९५ २०.१७

तानसा ४८.९१५ ३३.७२

मध्य वैतरणा २२.४५२ ११.६०

समाधानकारक पावसानंतरही टंचाई

मागील वर्षी ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासह धरण क्षेत्रातदेखील समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. तसेच अनेक धरणे भरून वाहू लागली होती. मात्र यंदा वातावरणातील बदलामुळे उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तर धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पाणी पातळीत घट होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com