nashik sugar factory 
ॲग्रो विशेष

Nashik Sugar Factory : ‘नासाका’ कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात ४० लाख वेतन अखेर वर्ग

Sugar Mill Employee : कारखान्यातील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांचे वेतन थकले होते. थकित वेतनासाठी युनियनने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Team Agrowon

Nashik News : सर्वोच्च न्यायालयाने नाशिक सहकारी साखर कारखान्यांतील कर्मचाऱ्यांचे थकित वेतन देण्याचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आदेश देऊनही वेतनाची दीड कोटीची रक्कम रोख स्वरूपात मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १२) थेट जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले, कर्मचाऱ्यांचे वेतन रोखीने वर्ग करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी या वेळी केली. त्यावर बँक प्रशासनाने लागलीच ४० लाख रुपये शाखेत वर्ग केले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

कारखान्यातील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांचे वेतन थकले होते. थकित वेतनासाठी युनियनने न्यायालयात याचिका दाखल केली होती. नाशिक न्यायालय, उच्च न्यायालय त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली. यात जिल्हा बँक, कर्मचारी व पीएफ कार्यालय यांच्यात समझोत्यानंतर सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२४ मध्ये कर्मचाऱ्यांचे १.५० कोटीचे वेतन अदा करण्याचे आदेश जिल्हा बँकेला दिले होते.

या आदेशानंतर, कर्मचारी युनियनने बँक प्रशासनाशी चर्चा करत वेतनाची मागणी केली. मात्र बँकेने ३१ मार्चचे कारण पुढे केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही त्यास साद देत थांबण्याचा निर्णय घेतला. ३१ मार्च झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा वेतनासाठी मागणी केली. परंतु बँक प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला तुम्ही त्यावर कर्मचारी युनियनने पुन्हा कामगार न्यायालयात दाद मागितली.

बँकेने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे मान्य केले होते. परंतु वेतन देण्यास टाळाटाळ होऊ लागली होती. कर्मचारी युनियनचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, नामदेव बोराडे, रामचंद्र टिळे, सोमनाथ नरवडे यांनी शुक्रवारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्या दालानाबाहेर ठिय्या मांडला.

न्यायालयाचे आदेश असल्याने सर्व रक्कम अदा केली जाईल. केवळ बँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नासाका कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनाची रक्कम तीन टप्प्यांत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील ४० लाखांची रक्कम जिल्हा बँकेच्या शाखेत वर्ग करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची सर्व रक्कम २३ जुलैपर्यंत वर्ग केली जाईल.
- संजय पाटील, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा बँक
बँक शेतकऱ्यांची असल्याने आम्ही सहकार्य करत होतो. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही वेळेवर पैसे मिळत नव्हते, त्यामुळे आंदोलन करावे लागले.
- विष्णुपंत गायके, अध्यक्ष-कर्मचारी युनियन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT