Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Sugar Factory Loan : सत्ताधाऱ्यांना थकहमी, विरोधकांची कोंडी

Sugar Factory Update : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील १३ सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमने १८९८ कोटी रुपयांची थकहमी देण्यात आली आहे.

Mumbai News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील १३ सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमने १८९८ कोटी रुपयांची थकहमी देण्यात आली आहे. ही थकहमी देताना सत्ताधारी पक्षाच्या कारखानदारांना पायघड्या आणि विरोधकांना डावलण्याचा प्रकारही घडला आहे. तसेच शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी थकहमी नाकारल्याने कारखाना सलग दुसऱ्या वर्षी बंद राहण्याची शक्यता आहे.

Sugar Factory
Bidri Sugar Factory : कारवाई मागे घ्या, अन्यथा तीव्र लढा, 'बिद्री’च्या शेतकरी, सभासदांचा कागल तहसीलवर मोर्चा

राज्यातील १३ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने २७ मार्च रोजी राष्ट्रीय सहकार विकास निगमला प्रस्ताव पाठविला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या काळात या प्रस्तावावर कार्यवाही होऊ नये याची दक्षताही घेतली होती. दरम्यान, काँग्रेच्या संग्राम थोपटे यांच्या कारखान्यालाही थकहमी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेले अशोक पवार यांच्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी ‘एनसीडीसी’ने थकहमी नाकारली आहे. मागील वर्षी हा कारखाना थकबाकी नसतानाही केवळ राजकीय कारणांमुळे पवार यांना थकहमी मिळाली नव्हती. यंदाही ती नाकारल्याने हा कारखाना थकबाकीत जाणार आहे. त्यामुळे कारखाना सुरू होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पवार यांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडूनही ऑफर असल्याचे समजते. मात्र ही ऑफर मान्य न केल्याने त्यांचा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला आहे.

Sugar Factory
Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखरविक्री कारखान्यांच्या अंगलट

‘एनसीडीसी’ने थकहमी दिलेले कारखाने (रक्कम कोटींत)
लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना (धारूर, बीड) : १०४ कोटी (आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी, अजित पवार गट)

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा : १०० कोटी (समाधान अवताडे, भाजप)

वृद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना, पाथर्डी : ९९ कोटी (आमदार मोनिका राजळे, भाजप)

लोकनेते मारुतीराव घुले पाटील सहकारी साखर कारखाना, नेवासा : १५० कोटी (नरेंद्र घुले, राष्ट्रवादी अजित पवार गट)

किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना, वाई : ३५० कोटी (आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गट)

किसनवीर खंडाळा सहकारी साखर कारखाना, खंडाळा : १५० कोटी : (आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादी, अजित पवार गट)

अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले : १०० कोटी (सीताराम गायकर, राष्ट्रवादी, अजित पवार गट)

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, शिंगणापूर : १२५ कोटी (माजी आमदार स्नेहलता कोल्हे, भाजप)

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, वारणानगर : ३५० कोटी (आमदार विनय कोरे, भाजप)

श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, उमरगा : १०० (बसवराज पाटील, भाजप)

राजगड सहकारी साखर कारखाना, भोर : ८० कोटी (संग्राम थोपटे, काँग्रेस)

अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाई : ८० कोटी (रमेश आडसकर, भाजप)

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा : ११० कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com