Takari Upsa Irrigation Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’तून उचलले ४ टीएमसी पाणी

Agriculture Irrigation : ताकारी उपसा सिंचन योजना सुरू करून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जात आहे. यंदा कमी पावसामुळे शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली.

Team Agrowon

Sangli News : ताकारी उपसा सिंचन योजना सुरू करून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जात आहे. यंदा कमी पावसामुळे शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे ताकारी योजनेचे आवर्तन सुरू करून शेतीला पाणी दिले. ताकारी योजनेतून पावसाळी आणि रब्बी हंगामातील दोन आवर्तने सुरू केली असून ४.४७ टीएमसी इतके पाणी उचलून शेतीला दिले आहे.

सुमारे साडेचार टीएमसी पाणी ताकारी योजनेच्या वाट्याचे शिल्लक आहे. एप्रिलच्या मध्यापासून रब्बीचे तिसरे आवर्तन सुरू केले जाईल, अशी माहिती योजनेच्या सूत्रांनी दिली. कृष्णा-कोयना सिंचन लवादाने ताकारी योजनेच्या पावसाळ्यासाठी १.८५, रब्बीसाठी ४.३७ तर उन्हाळी आवर्तनासाठी ३.१२ टीएमसी असा एकूण ९.३४ टीएमसी पाणीसाठा राखीव आहे. ताकारी उपसा सिंचन योजना ही कडेगाव, खानापूर, तासगाव, पलूस, वाळवा तालुक्यांतील शेतीला फायदेशीर ठरते आहे.

या तालुक्यांतील सुमारे २७ हजार ४८० हेक्टर या सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात आहे. त्यापैकी लाभक्षेत्रातील सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. वास्तविक, यंदा पावसाने दडी मारली. त्यामुळे या लाभ क्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झाली. मुळात जूनमध्ये पाऊस झाला नसल्याने जून पासूनच शेतीला पाणी कमी पडल्याने योजना सुरू केली. पावसाळ्यातील आवर्तनासाठी १.३६ टीएमसी इतके पाणी उचलले.

दरम्यान लाभ क्षेत्रात पाणीटंचाईची दाहकता वाढली. त्यामुळे रब्बी हंगामातील आवर्तनेही लवकर सुरू करावी लागली. परंतु कोयना धरणच पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने रब्बी हंगामातील पहिले आणि दुसरे आवर्तन सुरू झाल्यानंतर पाणी कमी असल्याने काही दिवस योजना बंद करावी लागली होती. मात्र, कोयनेतून पाणी सोडल्याने कृष्णा नदीत पाणीसाठा वाढल्याने बंद ठेवलेली योजना पुन्हा सुरू केली. रब्बी हंगामात दोन आवर्तने झाली. या दोन्ही आवर्तनावेळी ३.११ टीएमसी पाणी उचलले. पावसाळी, रब्बी हंगामातील दोन आवर्तने असे एकूण तीन आवर्तनामध्ये ४.४७ टीएमसी पाणी शेतीसाठी पुरवले आहे.

लाभ क्षेत्रातील ८ कोटी २४ लाख पाणीपट्टी वसूल झाली आहे. त्यापैकी ३ कोटी ९५ लाख ही निव्वळ सिंचनाची पाणीपट्टी आहे. तर ४ कोटी २९ लाख ही वीजबिल आणि देखभालीसाठीची रक्कम आहे. ताकारीचे उन्हाळी आवर्तन एप्रिलच्या मध्यापासून सुरू करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यासाठी पंप दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Policy Implementation: पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा: जिल्हाधिकारी वर्षा मीना

Fruit Export Impact: निर्यातयोग्य फळ स्थानिक बाजारात आल्याने दरावर परिणाम

Women Agri Tools: महिलांसाठी कृषी अवजारे

Inspiration Story: कुबेराहून श्रीमंत असणारा गरीब

Ethanol Policy: इथेनॉलबाबत धोरणात्मक निर्णय आवश्यक

SCROLL FOR NEXT