Maharashtra Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Conditions : राज्यात दुष्काळाचे संकट गडद; मोठ्या धरणांमध्ये ३७.९१ पाणीसाठा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या वर्षी राज्यात सरासरी पेक्षा पाऊस कमी झाला. यामुळे यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांध्ये पाणीटंचाईचे चित्र आहे. अनेक जिल्ह्यांध्ये सध्या पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीला पाणी नसल्याने उभे पीक करपले असून जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनत आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला असून सर्वसामान्यांना पाण्याचा प्रश्न सतावत आहे. दरम्यान मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी राज्यातील सर्व धरणातील पाणीसाठ्यात मागील तीन दिवसात १.८५ टक्क्यांनी घट झाली आहे. तर सद्यस्थितीत राज्यातील सर्व धरणांमध्ये ३७.९१ टक्के पाणी शिल्लक आहे. हाच साठा गेल्यावर्षी याच दिवशी ४६.८३ टक्के होता. तर तीन दिवसांपुर्वी ३९. ७६ टक्के होता.

राज्यात सुमारे २,९९४ धरणे

सर्व लहान मोठी अशी धरणे मिळून राज्यात सुमारे २,९९४ धरणे आहेत. यात मोठे प्रकल्प-१३८, मध्यम प्रकल्प- २६० आणि लघू प्रकल्प- २५९६ आहेत. या सर्व धरणांमध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी ३७.९१ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जो तीन दिवसात सुमारे २ टक्क्यांनी घटला आहे. तर गेल्या वर्षी याच दिवशी या २,९९४ धरणांतील पाणी साठ्याची टक्केवारी ४६.८३ होती. यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.९२ टक्के पाण्याची कमतरता आहे.

राज्यातील धरणांचे विभाग आणि पाणीसाठा

राज्यातील नागपूर विभागात १६ लहान-मोठ्या धरणांची संख्या असून येथे ४८.८१ टक्के पाणीसाठा आहे. तर गेल्या वर्षी याच दिवशी येथील धरणांमध्ये २०.५५ टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागात देखील १० धरणांची स्थिती म्हणावी तशी चांगली नसून येथे ४५.४४ टक्के पाणीसाठा आहे. तर औरंगाबाद विभागात ४४ धरणांमध्ये सध्या २१.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षी तो ४३.०३ टक्के होता. यामुळे येथे सद्यस्थिती दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक विभागात गेल्या वर्षी ५७.६३ टक्के पाणीसाठा होता. यात यंदा चांगलीत घट झाली असून सद्यस्थितीत येथे ३९.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Drought Conditions

पुणे आणि कोकण विभाग

पुणे विभागात देखील स्थिती गंभीर असून येथे देखील पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १२ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवसात पुणे विभातील धरणांमध्ये ४७.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो यंदा ३६.६९ टक्क्यांवर आला आहे. तर कोकण विभागात ११ धरणे असून येथे ४४.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त २.६५ टक्क्यांनी कमी झाला आहे. तर राज्यातील फक्त मोठ्या धरणांचा विचार केल्यास १३८ धरणांमध्ये ३७.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्यावर्षी तो ४५.५४ टक्के होता.

मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा

गेल्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने धरणातील पाण्याच्या साठ्यात म्हणावी तसी वाढ झालेली नाही. उलट तापमानात वाढ झाल्याने धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. यामुळे राज्यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर (२६ मार्च) राज्यात ३ हजार गावांना ९४० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. तर एकट्या बीड जिल्ह्याने १५० टँकरची मागणी केली होती. तर मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असून येथे आठपैकी पाच जिल्ह्यांमधील ६४७ गावांना ७६३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

भूजल पातळी

तसेच यंदा भूजल पातळी सरासरी पेक्षा १.०१ मीटरने खाली गेल्याने नव्या कूपनलिकांना खोदाव्यात की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तर किमान ३०० फूट खोलीशिवाय नव्या कूपनलिकांना पाणी लागत नाही. तर विविध जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळसदृश स्थितीमुळे कूपनलिका बंद पडल्या आहेत. ही माहिती राज्याच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या तपासणीतून समोर आली आहे. तर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने ऑक्टोबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत भूजल पातळीची तपासणी केली होती.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ३५३ पैकी ३२ तालुक्यांमधील भूजल पातळी खाली गेल्याचे दिसून आले आहे. तर फक्त २ ठिकाणी भूजल पातळीत वाढ झाल्याचे उघड झाले आहे.

या अहवालानुसार जिल्ह्यानिहाय भूजल पातळी पुढील प्रमाणे

पुणे जिल्हा

भोर तालूका- १.१६, मुळशी तालूका-१.५७, वेल्हे तालूका-१.२८,

सातारा जिल्हा

जावळी तालूका-२.२३ आणि खंडाळा तालूका -१.९८

अहमदनगर जिल्हा

अकोले तालूका-२.५७ आणि जामखेड तालूका-१.८२

बीड जिल्हा (मराठवाडा)

परळी तालूका-१.९१

बुलडाणा जिल्हा (विदर्भ)

चिखली तालूका- १.०९ आणि लोणार तालूका- २.५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT