Drought Condition : चारा-पाण्यासाठी मेंढपाळांची भटकंती

Drought Update : दुष्काळाच्या झळा कसमादे भागातील मेंढपाळांना जाणवू लागल्या आहेत. पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. मेंढपाळांना मेंढ्यांच्या चाऱ्याबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
Drought
DroughtAgrowon

Nashik News : दुष्काळाच्या झळा कसमादे भागातील मेंढपाळांना जाणवू लागल्या आहेत. पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. मेंढपाळांना मेंढ्यांच्या चाऱ्याबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढल्याने गेल्या महिनाभरापासून कसमादे भागातील खामखेडा, पिळकोस, पिंपळदर, निरपूर, तिळवण, शेत शिवारातील पाण्याचे स्रोत आटल्याने मेंढपाळांना मेंढ्यांना पाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर भटकंती करावी लागत आहे.

Drought
Drought Update : ऐन उन्हाळ्यात गावतळे ठरतेय वरदान

भारनियमनामुळे ज्या दिवशी रात्रीची वीज असेल त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मेंढ्यांसाठी पाण्यासाठी तजवीज करावी लागते. अनेक ठिकाणी शेतमाळ्यांमध्ये प्लॅस्टिकचे ड्रम तसेच प्लॅस्टिक कागद, ताडपत्री जमिनीत अंथरूण त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस पाणी अडवून मेंढ्यांना पाणी देण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे.

Drought
Drought Condition : नागपूर जिल्ह्यातील पाच महसुली मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती घोषित

बागलाण, मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागात मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ बांधव आहेत. सध्या या भागात चारा तसेच पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने मेंढपाळांनी सध्या कळवणच्या पश्‍चिम पट्ट्यात आपला मोर्चा वळविला आहे. ढोलबारे, अमरावती पाडे येथील मेंढपाळ रांगडा कांदा, गावठी कांद्याची हिरवी पात ५० ते ६० किलोमीटर अंतरावरून वाहून नेत आहेत.

पाळीव जनावरांचाही प्रश्‍न ऐरणीवर

पावसाने सुरवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे. कारण, मेंढ्या जगविण्यासाठी ज्या भागात पाऊस पडला आहे, त्या भागात या मेंढपाळांना चाऱ्याच्या शोधात निघावे लागले आहे. पाळीव जनावरांनाही सध्या चाराटंचाई भासत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com