Nature Tourism Agrowon
ॲग्रो विशेष

Nature Tourism : सोलापूर जिल्ह्यात ३७ कोटींच्या निसर्ग पर्यटनाला गती

Team Agrowon

Solapur News : दोन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाला पूरक निसर्ग पर्यटनाचा विकास साधण्यासाठी चार तालुक्यांमध्ये ३७ कोटी ३४ लाखांच्या पाच प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे.

तर अक्कलकोट येथील निसर्ग पर्यटन केंद्राला चार कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. पंढरपूर येथील दोन प्रकल्प सुरू झाले. माळशिरस आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे दोन्ही प्रकल्प मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.

वर्षभरापासून जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न होत आहेत. इको टुरिझम हा पर्यटनाचा एक प्रकार आहे. जो नैसर्गिक सौंदर्याच्या ठिकाणी निसर्ग प्रवास आयोजित करण्यावर आधारित आहे.

यामुळे पर्यावरणाची हानी टाळली जाते आणि स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो. धार्मिक पर्यटनाला पूरक वातावरण निर्मिती होते. मिळालेला महसूल पर्यावरण आणि प्राण्यांच्या संरक्षणाच्या उपयोगात येतो. जिल्ह्याला पहिल्यांदाच निसर्ग पर्यटन केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे.

पंढरपूर तालुका

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील दामाजी महाराज पालखी मार्ग आणि करकंबजवळील मेंडापूर येथील देवी मंदिर परिसरात इको टुरिझम पार्क असे दोन प्रकल्प सुरू आहेत.

दक्षिण सोलापूर तालुका

श्री सिद्धेश्वर वनविहार ८ कोटी ९५ लाख रुपयांचे निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यात येत असून यामध्ये विविध १६ प्रकारे वन आणि विज्ञान व्याख्यान केंद्रासह सौर यंत्रणा, टेलिस्कोपिक झोपडी, ॲप्रोच रोड, बॅटरीवर चालणारे वाहन, सायकल, जुन्या व्हॅनचे पुनरुज्जीवन, कंपाउंड वाल, विज्ञान व्याख्यान केंद, सीसीटीव्ही कॅमेरे, बटरफ्लाय कॅमेरे आदी १६ प्रकारचे कामांचा समावेश आहे.

निसर्ग पर्यटन केंद्राची जिल्ह्यातील ठिकाणे

दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेहरूनगर येथील श्री सिद्धेश्वर वनविहार

माळशिरस तालुक्यातील गारवाड मार्गावर

अक्कलकोट-सोलापूर मार्गावरील कर्जाळ गाव परिसरात

पंढरपूर तालुक्यात कासेगाव

जिल्ह्यात दोन टक्के क्षेत्र वनविभागाचे आहे. त्यात मंदिर परिसर, महामार्गालगत वनविभागाच्या जागा विकसित करण्याला प्राधान्य दिले आहे. तीन प्रकल्पांना सुरवात झाली आहे.
- धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT