Agri Tourism : कोकणात १६८ कृषी पर्यटन केंद्रांना मान्यता

Agri Tourism Policy : पर्यटन मंत्रलायाच्या कृषी पर्यटन धोरणाअंतर्गत कोकण विभागात पर्यटन विभागाकडून आतापर्यंत १६८ जणांना कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
Agri Tourism
Agri Tourism Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : पर्यटन मंत्रलायाच्या कृषी पर्यटन धोरणाअंतर्गत कोकण विभागात पर्यटन विभागाकडून आतापर्यंत १६८ जणांना कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २३ प्रस्ताव मजूर करण्यात आले आहेत. यामुळे पर्यटन व्यावसायासासह तरुणांना रोजगारही मिळणार आहे.

कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास साधणे, शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, कृषी पर्यटनाला कृषीपूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील लोककला आणि परंपरा यांचे दर्शन घडविणे, ग्रामीण महिला व तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शहरी भागातील लोकांना, विद्यार्थ्यांना शेती आणि शेती पद्धती तसेच कृषी संलग्न व्यवसायाची माहिती देणे, ग्रामीण भागातील राहणीमान उंचावणे,

Agri Tourism
Agri Tourism : कृषी पर्यटनातील संधीच्या प्रसारासाठी होणार प्रयत्न

पर्यटकांना प्रदूषणमुक्त शांत व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद देणे, प्रत्यक्ष शेतातील कामाचा अनुभव देणे, शेतावरील कृषी मालाच्या प्राथमिक प्रक्रियेस प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील पडीक गायरान आणि क्षार जमिनी उपयोगात आणणे या उद्देशावर कृषी धोरण अवलंबून आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, शेळी व मेंढीपालन,

Agri Tourism
Agri Tourism Center : पालघरमधील निधी गावड यांनी नारळ, सुपारीच्या बागेत साकारले कृषी पर्यटन केंद्र

कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय आदी कृषी संलग्न विषयांचा एकत्रित विचार केल्यास कोकणातील ग्रामीण भागांसह किनारी भागात कृषी पर्यटनासह मत्स्य शेतीलाही निश्चितपणे चालना मिळू शकते. कृषी पर्यटन धोरणाअंतर्गत कोकणातील २५६ संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते.

त्यातील २४३ संस्थांनी यासाठी निश्चित केलेल्या प्रस्तावातील प्रक्षेत्राला पर्यटन अधिकाऱ्यांनी भेट देऊन फेर पडताळणीही केली. त्यापैकी १६८ प्रस्तावंना मान्यता मिळाली आहे. त्यात ठाणे २७, पालघरमधील ३८, रायगड ६१, रत्नागिरी २३ आणि सिंधुदुर्गातील १९ प्रस्तावांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com