Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : एप्रिल, मेमध्ये अवकाळीने सांगलीत ३६६ हेक्टरवर नुकसान

Farmer Issue : सांगली जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ९४३ शेतकऱ्यांचे ३६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ९४३ शेतकऱ्यांचे ३६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे पूर्ण केले असून, हे पंचनामे वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. या पिकांचे भरपाईसाठी अंदाजे १ कोटी २५ लाखांच्या निधीची मागणी केली असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सर्वसाधारण पाऊस १६.५ मिलिमीटर आहे. तर मे महिन्यात ४८.६ मिलिमीटर सर्वसाधारण पाऊस असतो. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. एप्रिलमध्ये ८२ टक्के पाऊस झाला. तर मेमध्ये १३७ टक्के पाऊस पडला. या एप्रिल आणि मेमधील पावसामुळे फळ पिके आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.

एप्रिलमध्ये ५०२ शेतकऱ्यांचे २१९.१६ हेक्टर, तर मे महिन्यात ४४१ शेतकऱ्यांची १४७.८२ हेक्टरवरील पिके बाधित झाली.मिरज, वाळवा, पलूस, खानापूर, कडेगाव, जत, तासगाव आणि आटपाडी तालुक्यात एप्रिल आणि मेमध्ये ९४३ शेतकऱ्यांचे ३६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

एप्रिलमध्ये पिकांचे झालेले नुकसान

तालुका शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टर)

मिरज १४३ ६१.९५

वाळवा १४ ३.७५

पलूस ३६ १०.८८

खानापूर १६९ ७३.२६

कडेगाव ३३ ६.७०

तासगाव ४ २.४०

आटपाडी १ ०.५०

जत १०२ ५९.७०

एकूण ५०२ २१९.१४

मेमध्ये पिकांचे झालेले नुकसान

तालुका शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टर)

मिरज २९१ ९३.३९

वाळवा ४७ १४.७६

पलूस १५ ४.७०

आटपाडी १० ४.७२

जत ७८ ३०.२५

एकूण ४४१ १४७.८२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT