Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Level : मराठवाड्यातील प्रकल्पांत उपयुक्त साठा ३४ टक्के

Water Storage Update : मराठवाड्यातील ८७७ लहान, मोठ्या मध्यम प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ३४.७६ टक्क्यांवर आला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील ८७७ लहान, मोठ्या मध्यम प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ३४.७६ टक्क्यांवर आला आहे. झपाट्याने खालावत चाललेली प्रकल्पांमधील पाणीपातळी चिंता वाढविणारी आहे.

मराठवाड्यातील मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये आत्ताच्या घडीला ४१.४५ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. दुसरीकडे ७५ माध्यम प्रकल्पात केवळ १९.६४ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक असून ७४९ लघू प्रकल्पात त्यापेक्षा किंचित जास्त म्हणजे २०.४७ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये ४४ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये ३३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

जालन्यातील लघू प्रकल्पातील उपयुक्त पाणी संपले

मराठवाड्यातील एकूण ७५० लघू प्रकल्पांपैकी जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पांत उपयुक्त पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ लघू प्रकल्पात २० टक्के, बीड व लातूर जिल्ह्यांतील अनुक्रमे १२६ व १३४ लघू प्रकल्पात प्रत्येकी १८ टक्के, धाराशिव जिल्ह्यातील सर्वाधिक २०६ लघू प्रकल्पात १३ टक्के, नांदेड जिल्ह्यातील ८० प्रकल्पांत ६२ टक्के तर परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पात ९ टक्के व हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पांत ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. आजच्या घडीला २०२३ मध्ये सर्व लघू प्रकल्पांमध्ये ५३ टक्के, तर २०२२ मध्ये ६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

जालन्यातील प्रकल्पात ९ टक्के उपयुक्त साठा

जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात केवळ ९ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. धाराशिव जिल्ह्यातील १७ प्रकल्पांत आठ टक्के, परभणीमधील दोन प्रकल्प ११ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील १६ प्रकल्पात १६ टक्के, बीड मधील १६ प्रकल्पात ३० टक्के तर लातूरमधील ८ मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

तीन मध्यम, ७२ लघू प्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील ७५० लघू प्रकल्पांपैकी धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील तब्बल ७२ लघू, तसेच धाराशिव, बीड व जालना या तीन जिल्ह्यांतील प्रत्येकी एक मिळून तीन मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत.

२७० प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली

मराठवाड्यातील २३ मध्यम व २४७ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जो त्याखाली गेला आहे. पाणीसाठा जोत्याखाली गेलेल्या लघु प्रकल्पांमध्ये जालना व लातूरमधील प्रत्येकी तीन, बीडमधील ६, छत्रपती संभाजीनगरमधील दोन, धाराशिवमधील आठ व नांदेड मधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. दुसरीकडे पाणीसाठा जोत्याखाली गेलेल्या लघू प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २७, जालन्यामधील १०, बीडमधील ५५, लातूरमधील ४७ ,धाराशिवमधील ९३, नांदेडमधील २, परभणीतील १३ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT