Farmer Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Farmer Relief: राज्यात नुकसानीपोटी ३३७ कोटींची मदत

Crop Damage Aid: अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांची नुकसान मदत निधीस मदत व पुनर्वसन विभागाने मान्यता दिली आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांची नुकसान मदत निधीस मदत व पुनर्वसन विभागाने मान्यता दिली आहे.

फेब्रुवारी ते मे या काळात नुकसानीमुळे ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. या कालावधीत गारपिटीमुळे छत्रपती संभाजीनगर विभागामधील ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ५४२.४६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी ५९ कोटी ९८ लाख २० हजार रुपये.

पुणे विभागातील १ लाख ७ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या ४५ हजार १२८.८८ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी ८१ कोटी २७ लाख २७ हजार रुपये. नाशिक विभागातील १ लाख ५ हजार १४७ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ९३५.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी ८५ कोटी ६७ लाख ८ हजार रुपये. कोकण विभागातील १३ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या ४ हजार ४७३.६९ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार रुपये.

तर, अमरावती विभागातील ५४ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या ३६ हजार १८९.८६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी ६६ कोटी १९ लाख ११ हजार रुपये. नागपूर विभागातील ५० हजार १९४ शेतकऱ्यांच्या २० हजार ७८३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार रुपये मदत वितरित करण्यात येणार आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिली आहे.
मकरंद जाधव-पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Warna Dam : वारणा धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

SCROLL FOR NEXT