Betel Leaf Agrowon
ॲग्रो विशेष

Betel Leaf Farm : अतिपावसामुळे ३० टक्के पानमळे धोक्यात

Heavy Rain : पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, लातूर, पंढरपूर आणि गुजरात येथील पानांच्या बाजारपेठेत या भागातील पानांची विक्री होते. जून महिन्यापासून पानांचा मागणी वाढली होती.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : अतिपाऊस झाल्यामुळे नागवेलीची मुळे कुजू लागली आहेत. पावसाने पानमळ्याची खूप मोठी हानी केली आहे. पानमळ्यासाठी घातलेला खर्च वाया गेला आहे. त्यातच दर कमी असल्याने ताळमेळ कसा घालायचा, असा प्रश्न पडला आहे.

आमच्यासमोर पडला असल्याची व्यथा मिरज तालुक्यातील पान उत्पादक शेतकरी मांडत होते. अतिपावसामुळे अंदाजे ३० टक्के क्षेत्रावरील पानमळ्यात मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पानमळे धोक्यात आले आहेत.

मिरज तालुक्यातील आरग, बेडग, नरवाड, लिंगनुर, खटाव, खंडेराजूरी आणि गुंडेवाडी या गावात पानमळे आहेत. या सात गावांत अंदाजे ३२५ एकरांवर पानमळे आहेत. प्रतिकूल परिस्थिती शेतकरी पानमळ्याची शेती आजही करत आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी कोरोनामुळे पानमळे धोक्यात आले होते. त्यातूनही शेतकऱ्यांनी पानमळे जीवंत ठेवले.

पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, लातूर, पंढरपूर आणि गुजरात येथील पानांच्या बाजारपेठेत या भागातील पानांची विक्री होते. जून महिन्यापासून पानांचा मागणी वाढली होती. त्यामुळे दरही चांगले मिळाले. त्यामुळे पान उत्पादक शेतकऱ्यांना दिसाला मिळाला. जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वदूर भागात पावसाला सुरुवात झाली.

मिरज तालुक्यात जुलै महिन्यात २२३ मिलिमीटर इतका पाऊस झाला. तालुक्यात अतिपाऊस झाला. त्यामुळे या अतिपावसाचा फटका पानमळ्यांना बसला. शेतात पाणी साचून राहिले. सलग पाऊस सुरू असल्याने शेतीतील पाणी कमी झाले नाही.

त्यामुळे मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. मुळ कूज झाल्याने वेल वाळून जातो. परिणामी पानमळे धोक्यात आले आहेत. अतिपावसामुळे सुमारे ३० टक्के क्षेत्रावर मूळकुज झाली असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या श्रावण महिना सुरू आहे. पान विक्रीचा हंगाम सुरू आहे. श्रावण महिन्यात पानांना चांगले दर मिळतात. मात्र, यंदा श्रावणात पानांना अपेक्षित दर नसल्याने अगोदरच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच ऐन हंगामात अतिपावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पानमळ्यांना घातलेला खर्च कसा निघणार असा प्रश्न पान उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

पानमळ्यांना अतिपावसाचा फटका बसलाच आहे. मूळकुज रोगामुळे नागवेली सुकून जात आहेत. त्याचबरोबर दरही नाहीत. घातलेला खर्च कसा निघणार असा प्रश्न आहेच. आमच्या पानमळ्यांचे झालेले नुकसान पाहायला कोणीही येत नाही.
- हरी नागरगोजे, पान उत्पादक शेतकरी, नरवाड, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळद सोयाबीनचे भाव टिकून; कापसात चढ उतार, हरभरा भाव दबावातच तर गव्हाची आवक वाढली

Gramrozgar Sevak Strike: ग्रामरोजगार सहायकांचा बेमुदत संप सुरू

Water Levels Drop: जलसंकटाची चाहूल! देशातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा ४५ टक्क्यांच्या खाली

Mango Farmer Demands: आंबा बागायतदारांना हेक्टरी दोन लाख रुपये द्या

Water Projects Issues: पाझर तलावाची दुरुस्ती निधीअभावी रखडली

SCROLL FOR NEXT