Sangli News : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. शिराळा तालुक्यातील वारणा धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे वारणा धरणातून सोमवारी (ता. १८) ६६३० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. वारणा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. वारणा धरण पाणलोटक्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली..जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी, अधूनमधून हलका पाऊस पडत होता. दोन ते तीन दिवासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. शिराळा तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. वारणा धरण पाणलोट परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून धरणाची पाणी पातळी वाढत आहे. रविवारी (ता. १७) वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ४० मिमी पावसाची नोंद झाली. .Girna Dam Water Storage : गिरणा धरणातील जलसाठा वाढतोय.धरणात १२ हजार २४४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. वक्रद्वारातून ५००० क्युसेक तर विद्युतगृहातून १६३० क्युसेक असा एकूण ६६३० क्युसेकने विसर्ग सुरू आहे..जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस या तालुक्यांत पावसाची रिमझिम सुरू आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १ ते १८ ऑगस्टअखेर ७७.५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात अठरा दिवसांत सरासरी ९ दिवस पाऊस झाला. शिराळा तालुक्यात अठरा दिवसांत १०३.४ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभर हलका पाऊस सुरू होता..Dam Water Storage : प्रकल्पांतील उपयुक्त साठा पोहोचला २८.४८ टक्क्यांवर.अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवलाअलमट्टी धरणातून १ लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन ते तीन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदी (कल्लोळ बॅरेज)आणि घटप्रभा नदीमधून (लोलासूर पूल) विसर्ग वाढणार आहे..त्यामुळे अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला आहे. सोमवारी (ता. १८) सकाळपासून धरणातून २५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या धरणातून १ लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग होत आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.