Sindhudurg News : सिंधुदुर्गात सुरू असलेल्या संततधारेने जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही मार्गांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. काही नद्या इशारा पातळीनजीक पोहोचल्या आहेत तर काही मार्गांवर दरडी कोसळल्या आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. जिल्ह्यात मुसळधार सुरूच असल्याने गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. .जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडी तालुक्यात रविवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. दुपारनंतर वैभववाडी, कुडाळ, देवगड या तालुक्यांमध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वत्र रात्रभर संततधार सुरू आहे. सोमवारी (ता. १८) सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. .Nanded Heavy Rain: नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर, हसनाळ गावामध्ये लष्कर दाखल.त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील तिलारी, शुक, गडनदी या नद्या इशारा पातळीनजीक पोहोचल्या आहेत. कणकवली तालुक्यातील कणकवली आचरा मार्गावर उर्सुला विद्यालयानजीक पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शिवडाव परबवाडी, वागदे आजगणी मार्गावरील कासरल, सातरल, भिरवंडे, दुकानवाड, निवजे या मार्गावर पुराचे पाणी वाहत आहे..त्यामुळे या सर्व मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे. काही मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी-शिराळे मार्गावर दरड कोसळली आहे. .Heavy Rain: अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत.दगड, मातीचा मोठा भराव रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. खारेपाटण शहरात पुराचे पाणी वाढत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास तेथे पूरस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे..तालुकानिहाय पाऊसदेवगड - १०० मि.मी, मालवण - ३३, सावंतवाडी - १०५, वेंगुर्ला - ४९, कणकवली - १७२, कुडाळ - ८२, वैभववाडी - १०७, दोडामार्ग तालुक्यात ४३ मिमी पावसाची नोंद झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.