Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

RDSS Scheme : केंद्राच्या आरडीएसएस योजनेतून जिल्ह्यात ३ हजार ३७४ कोटी रुपयांची कामे

Government Scheme : वाढत्या मागणीप्रमाणे वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने आरडीएसएस ही चार लाख कोटी रुपये खर्चाची योजना देशभर राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : वाढत्या मागणीप्रमाणे वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने आरडीएसएस ही चार लाख कोटी रुपये खर्चाची योजना देशभर राबविण्यात येत आहे.

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३३७४ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली, असल्याचे एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्‍वास पाठक यांनी नुकतेच स्पष्ट केले.

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या नुकत्याच पार पडलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंग राजपूत, महावितरणचे संचालक संजय ताकसांडे, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर, महापारेषणचे संचालक संदीप कलंत्री, महावितरणचे विभागीय संचालक प्रकाश खपले, मुख्य अभियंता मुरहरी केळे आणि महापारेषणचे मुख्य अभियंता अविनाश निंबाळकर या वेळी उपस्थित होते.

श्री. पाठक म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आरडीएसएस योजना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या दोन योजनांमुळे राज्याच्या वीज क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा होणार आहेत. यामुळे वीज पुरवठ्याचे प्रश्‍न सुटतील. ही योजना आगामी १८ महिन्यांत पूर्ण करायची आहे.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा व्हावा या दृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला चालना दिली आहे. या योजनेत सौरऊर्जेचा वापर करून सात हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

त्यापैकी साडेतीन हजार मेगावॉट वीजनिर्मितीची टेंडर प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २२२ मेगावॉट वीजनिर्मितीचा समावेश आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांची प्राधान्याने अंमलबजावणी करावी, अशी सूचना श्री. पाठक यांनी अधिकाऱ्यांना केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

NCCF Onion Procurement : ‘एनसीसीएफ’कडूनही माहिती देण्यास टाळाटाळ

MahaDBT : महा़डीबीटीकडून पूर्वसंमतीसाठी अडीच हजारांवर शेतकरी प्रतीक्षेत

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Lumpy Skin : खानदेशात ‘लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण प्रक्रिया संथ

SCROLL FOR NEXT