Dr. Sharad Gadakh
Dr. Sharad GadakhAgrowon

Agriculture Center : कृषी प्रक्रिया केंद्राची उभारणी काळाची गरज

Dr. Sharad Gadakh : हवामान बदलाच्या या कालखंडात शेतीविषयक समस्यांचे समयोचित शाश्वत समाधान शोधून वेळेत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणे व त्यावर अंमलबजावणी होणे खऱ्या अर्थाने काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

Nagpur News : हवामान बदलाच्या या कालखंडात शेतीविषयक समस्यांचे समयोचित शाश्वत समाधान शोधून वेळेत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणे व त्यावर अंमलबजावणी होणे खऱ्या अर्थाने काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांच्या संयुक्त सहकार्याने कृषी संशोधन केंद्र, तारसा येथील प्रक्षेत्रावर विद्यापीठ संशोधित धान पिकाच्या ‘पिडीकेव्ही तिलक’ वाणाचे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम ते बोलत होते. विद्यापीठ संशोधित धान पिकाच्या ‘पिडीकेव्हीं तिलक’ वाणाची लागवड व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे माध्यमातून धान प्रक्रिया उद्योगाचे जाळे निर्माण करण्यासाठी कृषी विद्यापीठ,

Dr. Sharad Gadakh
Agriculture Input Center Strike : परभणी जिल्ह्यात गुरुवार ते शनिवार कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद

कृषी विभाग व इतर सर्वच समांतर संस्थांनी एकात्मिक प्रयत्नांची गरज देखील कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी प्रतिपादित केली. डॉ. गडाख यांनी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व महाबीज यांचे संयुक्त प्रयत्न शेतीला सुगीचे दिवस आणण्यात साहाय्यभूत ठरतात असे सांगताना मॉडेल व्हिलेज निर्मितीच्या विद्यापीठाच्या उपक्रमाचे सर्वच समांतर संस्थाने सहभाग नोंदवत आदर्श गाव निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

तर, पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आंतरपिकांचा समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड निश्चितच फायदेशीर ठरत असून व्यावसायिक शेतीची संकल्पना अवलंबतांना एकात्मिक शेती पद्धती कालसुसंगत असून शाश्वत शेतीसाठी अकोला कृषी विद्यापीठाचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी केले.

Dr. Sharad Gadakh
Agriculture Department : पालकमंत्र्यांनी घेतला कृषी विभागाचा ‘क्लास’

कृषी विद्यापीठाद्वारे संशोधित आणि शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले पीक वाण व्यावसायिक तत्त्वावर निर्माण करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी महाबीजची कटिबद्धता सुद्धा कलंत्रे यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केली. ‘पिडीकेव्हीं तिलक’ वाणाचे पैदासकार डॉ. जी. आर. श्यामकुंवर यांनी मार्गदर्शन केले.

विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदिरवाडे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, महाबीजचे एल. एच. मेश्राम यांचे सह कृषी संशोधन केंद्र तारसाचे प्रभारी अधिकारी डॉ. व्ही. के. बिरादार यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एस. एस. पांडे यांनी केले तर कृषी संशोधन केंद्र तारसाचे प्रभारी अधिकारी डॉ. व्हीं के बिरादार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com