Dimbhe Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Dimbhe Dam Water : डिंभे धरणातून चार दिवसांत २.८७ टीएमसी पाण्याचा विसर्ग

Team Agrowon

Pune News : हुतात्मा बाबू गेणू जलाशय (डिंभे धरण) च्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सध्या विश्रांती जरी घेतली असली तरी २२ जुलै रोजी सकाळी धरणात २७.५३ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतर अवघ्या १३ दिवसांत धरण पाण्याने तुडुंब भरले असून, मागील चार दिवसांत २.८७ टीएमसी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग घोडनदी पात्रात करण्यात आल्याची माहिती डिंभे धरणाचे उपअभियंता दत्तात्रेय कोकणे यांनी दिली.

यंदा डिंभे धरणाचा पाणीसाठा नीचांकी अर्धा टक्के होता. जुलैमध्ये काहीसा पाऊस पडल्यानंतर काहीसा टक्का वाढला पण पावसाचा जोर नव्हता. जुलै महिना संपण्याच्या तोंडावर २२ जुलै रोजी पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि धरणात २७.५३ टक्के पाणीसाठा होता.

२२ जुलै ते २५ जुलै चार दिवस झालेल्या जोरदार पावसाने पाणीसाठा दुप्पट होऊन २५ जुलै रोजी सकाळी ५६.४५ टक्के वर पोहोचला. त्यानंतर धरणातील पाण्याचा टक्का वाढत गेला आणि २५ जुलैनंतर पुढील १० दिवसांत धरण भरले आणि ४ ऑगस्ट रोजी सकाळी पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली.

४ ऑगस्ट रोजी धरणाचे पाचही दरवाजामधून २५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर पावसाचा जोर अजून वाढल्याने विसर्ग वाढून ७५००, ९०००, १२०००, १५०००, १८००० पर्यंत विसर्ग घोडनदी पात्रात करण्यात आला.

गुरुवारी (ता. ८) रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत ९२.४९ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. ४ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या चार दिवसांत धरणातून घोडनदी पात्रात तब्बल २.८७ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला असल्याची माहिती शाखा अभियंता तानाजी चिखले यांनी दिली.

यंदा धरण लवकर भरले

डिंभे धरण यंदा मागील वर्षीच्या तुलनेत लवकर भरले असून मागील वर्षी धरणात याच दिवशी ८२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा ९२.४९ टक्के असून धरणातून २६५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांसह नगर, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले धरण यंदा लवकर भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन मदतवाटपातील दिरंगाई ‘महसूल’मुळे नाही

Bihar Flood : बिहारमध्ये पूरस्थिती कायम; बागमती नदीवरील बंधारा फुटला

Sugar Market : कोटा घटविल्याने दसऱ्याला साखरेच्या दरात वाढ शक्य

Rabi Season 2024 : दमदार पाऊसमानामुळे ‘रब्बी’वर बळीराजाचा भर

Edible Oil Rate : आयात साठा शिल्लक असताना खाद्यतेलाचे दर का वाढविले?

SCROLL FOR NEXT