Pune Dam Water Storage : पुणे जिल्ह्यातील वीस धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरूच

Dam Water : मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत पावसाचा जोर अधिक
Ujani Dam water storage
Ujani Dam water storageagrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune news : पुणे : पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरी धरणक्षेत्रात हलक्या सरी पडत आहे. त्यामुळे धरणांत पाण्याची अजूनही आवक सुरू आहे. आत्तापर्यंत बहुतांश धरणे भरली असल्याने जवळपास २० धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे मुठा, मुळा, पवना, आरळा, भीमा, भामा, इंद्रायणी, कानंदी, नीरा, कुकडी, मीना, घोड या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

एक जूनपासून ते ५ ऑगस्ट या कालावधीत मुळशी घाटमाथ्यावर सर्वाधिक पाच हजार ३१९ मिलिमीटर पाऊस पडला, तर लोणावळा घाटमाथ्यावर ३ हजार ८५० मिलिमीटर, वळवण तीन हजार ४५७, ठोकरवाडी दोन हजार ३०१, कुंडली दोन हजार ८५५, शिरोटा दोन हजार ७३९ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे मुळशी, आंध्रा, वळवण, लोणावळा या धरणांत जवळपास ४१.६५ टीएमसी एवढा पाणीसाठा दाखल झाला आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी मुळशी धरणांतून २२ हजार ६८७ क्युसेकने सोडलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

Ujani Dam water storage
Pune Dam Discharge : पुणे जिल्ह्यातील १४ धरणांतून पाण्याचा विसर्ग

गेल्या काही दिवसांपासून मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे आत्तापर्यंत चार धरणे शंभर टक्के भरली आहेत. उर्वरित धरणांतही ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून काही धरणे लवकरच भरण्याची शक्यता आहे. सध्या जी धरणे ८०-९० टक्के भरली आहेत, अशा धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पूर्व भागातील धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे
बुधवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणक्षेत्रांत तुरळक पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणांत बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तासांमध्ये एकूण ०.८१ एवढा पाणीसाठा दाखल झाला आहे. आत्तापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांत पाणीसाठा ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. नीरा खोऱ्यातील पवना, कळमोडी, चासकमान, आंध्रा, वडिवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणांतील पाणीसाठा ७०-८० टक्क्यांहून अधिक झाला आहे. काही धरणे भरत आल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. कुकडी खोऱ्यातही पावसाचे प्रमाण काहीसे कमी असले तरी येडगाव, डिंभे, चिल्हेवाडी या धरणांतील पाणीसाठा ७० टक्क्यांहून अधिक झाला आहे. त्यामुळे मीना, कुकडी, आरळा, पवना या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.


धरणनिहाय पाण्याचा विसर्ग (क्युसेकमध्ये)
टेमघर १३६२, वरसगाव ६००, पानशेत ६००, खडकवासला १४८५, पवना १४००, कासारसाई २७६, कळमोडी ५६१, चासकमान ३५५०, आंध्रा ६३७, वडिवळे ६२८, गुंजवणी २५०, भाटघर १६३१, नीरा देवघर ७५०, वीर १९४९, येडगाव १४००, वडज ३००, डिंभे २५५०, चिल्हेवाडी ८५५, घोड १०,३७२, उजनी ५४,३२२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com