Cotton Production Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Cotton Update : यंदा सुमारे १६ लाख कापूसगाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्मिती खानदेशातील ११२ जिनिंग प्रेसिंग कारखान्यांत झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा कापूस प्रक्रिया उद्योग सुरुवातीपासून संथ आहे. त्यातच कापसाचा कमी पुरवठा, बंद होत असलेले कारखाने यामुळे अपेक्षित कापूस प्रक्रिया होत नसल्याने यंदा सुमारे १६ लाख कापूसगाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्मिती खानदेशातील ११२ जिनिंग प्रेसिंग कारखान्यांत झाली आहे.

यंदाही २२ ते २३ लाख कापूसगाठींची निर्मिती खानदेशात होईल, अशी अपेक्षा होती. परंतु कापसाचा पुरवठा यंदाही कमी किंवा विस्कळीत होता. कापसाची आवक डिसेंबरमध्ये वाढली. या काळात खानदेशात रोज २२ ते २५ हजार क्विंटल कापसावर प्रक्रिया केली जात होती. कापसाचा हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर असा असतो. या १२ महिन्यांच्या कालावधीत खानदेशात २२ ते २३ लाख कापूसगाठींची निर्मिती होईल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रक्रिया उद्योग हवा तसा कार्यरत नव्हता.

१५० पैकी फक्त ११२ जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू होते. अन्य कारखाने वित्तीय संकटे, कर्ज यामुळे सुरू झाले नाहीत. तसेच दिवाळीनंतर मजूरटंचाईदेखील होती. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत खानदेशात प्रतिदिन सरासरी २२ हजार क्विंटल कापसाचा पुरवठा झाला. त्यावर प्रक्रियाही सुरू होती. परंतु मार्चमध्ये आवक घटली. कारण कमाल शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली. स्थानिक क्षेत्रात कापसाची आवक अत्यल्प आहे.

यामुळे अनेक कारखाने लवकरच बंद होतील, अशी स्थिती आहे. काही वित्तीय स्थिती चांगले असलेले कारखाने राज्यातून किंवा अन्य भागातून कापसाचा रोज पुरवठा करून घेत आहेत. खानदेशातील कारखान्यांत २५ लाख कापूसगाठींपेक्षा अधिकच्या रुई निर्मितीची क्षमता आहे. परंतु कापसाचा कमी पुरवठा, बंद होत असलेले कारखाने यामुळे अपेक्षित कापूस प्रक्रिया होत नसल्याची स्थिती आहे.

२०११ ते २०१४ या कालावधीपर्यंत खानदेशात दर वर्षी किमान २२ ते २३ लाख कापूसगाठींची निर्मिती झाली आहे. यंदा सुमारे १६ लाख कापूसगाठींची निर्मिती झाली असून, २५ टक्क्यांनी ही निर्मिती यंदा कमी झाली आहे. २०१४ नंतर कापूस गाठींची अपेक्षित निर्मिती होऊ शकलेली नसल्याची स्थिती आहे.

खानदेशातील कापूसगाठी उत्पादन (लाख गाठीमध्ये )

वर्ष उत्पादन

२०२१ २१

२०२२ २१.५०

२०२३ २०.६०

२०२४ १८ (अपेक्षित )

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

Drought Relief : दुष्काळसदृश स्थितीत पाणी, चारा, रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

SCROLL FOR NEXT