Farmer Distress : जळगाव हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२५-२६ मध्ये सहभागी झालेल्या केळी विमाधारकांना अद्याप परतावे मिळालेले नाहीत. परतावे लवकरात लवकर द्यावेत, तसेच चुकीच्या पद्धतीने क्षेत्र कमी केलेल्या विमाधारकांचे क्षेत्र पूर्ववत करून त्यांनी जेवढ्या क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेतले होते, तेवढ्या क्षेत्रासाठी परतावे द्यावेत, अशा विविध मागण्या शेतकरी करीत आहेत..याबाबत जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर केळी विमाधारक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मोर्चात जिल्ह्यातील शेकडो विमाधारक शेतकरी सहभागी झाले होते. मागण्यांची दखल न घेतल्यास पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. अद्याप कोण पात्र आणि कोण अपात्र, याची माहिती विमा कंपनीने जाहीर केलेली नाही..Crop Damage Panchnama : पंचनाम्यांपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षाच.जिल्ह्यातील काही तालुक्यांत मागील दोन-तीन दिवसांत विमा परतावे देण्यात आले आहेत. मात्र, चोपडा, यावल, जळगाव, रावेर आदी भागांतील क्षेत्र कमी केलेल्या (ओव्हर इन्शुरन्स) विमाधारकांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दोन हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड करून विमा संरक्षण घेतलेल्या काही शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र विमा कंपनीने केवळ १० ते १५ आर इतके केले आहे. जळगाव व रावेर भागातील अनेक केळी विमाधारकांचे क्षेत्र अशा प्रकारे कमी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे..अन्यायग्रस्त विमाधारकांनी विमा कंपनी तसेच कृषी विभागाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, संबंधित तक्रारींची दखल घेण्यात आलेली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संबंधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून केळीची लागवड झाली आहे का, किती क्षेत्रावर लागवड झाली आहे, याबाबत पंचनामे करून विमा परतावे देण्याची मागणी करण्यात आली आहे..Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी.विमा कंपनीने जिल्ह्यात अनेक विमाधारकांचे क्षेत्र एमआरसॅक या उपग्रहाधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी केले आहे. या तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून क्षेत्र कमी करण्यात आल्याचा दावा विमाधारक शेतकरी करीत आहेत..या आहेत मागण्याफळ पीकविमा योजनेत २०२५-२६ मध्ये सहभागी झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांच्या क्षेत्रकपातीसंबंधीच्या तक्रारी निकाली काढून विमाधारकांच्या हिताचा निर्णय घ्यावा.तक्रारदार शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करून त्यांना विमा परतावे द्यावेत.शेतात केळीचे पीक असतानाही ज्या विमाधारकांचे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत, त्यांची तत्काळ फेरचौकशी करून त्यांना विमा योजनेचा लाभ द्यावा.मागील सहा महिन्यांपासून केळी विमाधारक शेतकरी विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहेत. शासन व विमा कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाने समन्वय समिती स्थापन करून प्रश्न मार्गी लावावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.