Cotton Bales Production : तीन जिल्ह्यांत मिळून आठशे कापूसगाठी तयार

Cotton Market : कृषी विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी गटाद्वारे एकत्र येऊन गाठी तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
Cotton Bales
Cotton Bales Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : कृषी विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी गटाद्वारे एकत्र येऊन गाठी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. आजघडीला ८०० गाठी तयार झाल्या आहेत. सुमारे २ हजार गाठींची निर्मिती होण्याची आशा आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच कापूस उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन झाले. या कार्यक्रमात ही माहिती पुढे आली.

Cotton Bales
Cotton Bales Production : शेतकरी उत्पादित करणार दहा हजार कापूस गाठी

या वेळी नोडल अधिकारी यू. आर. घाटगे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, ‘महाकॉट’चे नोडल अधिकारी जयेश महाजन, ‘इफ्को’चे विभागीय व्यवस्थापक सुनील कुलकर्णी, सिल्लोड येथील जय भगवान बाबा जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीचे मालक आतिश ताटे उपस्थित होते. या वेळी गाठी तयार केलेल्या गटांचा व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Cotton Bales
Cotton Market : सरकारच्या आदेशाला व्यापारांकडून केराची टोपली; हमीभावापेक्षाही कमी भावाने कापूसाची खरेदी

तीन जिल्ह्यांतील १२ तालुक्यांतील प्रत्येकी १० ते १२ गावांपैकी एका गावातून १०० गाठींचा एक लाख याप्रमाणे कापूस गाठी उत्पादनाचे प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री, सिल्लोड व गंगापूर तसेच जालना जिल्ह्यातील घनसावंगी, जालना, बदनापूर, भोकरदन व बीड जिल्ह्यातील गेवराई, बीड, धारूर, माजलगाव तालुक्यांतील गावांचा यामध्ये समावेश आहे.

महाजन म्हणाले, ‘‘कापूस पिकाचे उत्पादन केल्यानंतर गाठी करून मूल्यवर्धन करणे क्रमप्राप्त आहे. तयार गाठींची विक्री ऑनलाइन पोर्टलद्वारे होईल. विक्रीनंतर थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com