Dada Bhuse Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Compensation : नाशिक जिल्ह्यात दुष्काळग्रस्तांना २४३ कोटींची मदत : भुसे

Drought Affected Compensation : नाशिक जिल्ह्यात दुष्काळामुळे गेल्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी २४३ कोटी रुपये जाहीर झाले आहेत.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात दुष्काळामुळे गेल्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी २४३ कोटी रुपये जाहीर झाले आहेत. मालेगाव, येवला व सिन्नर तालुक्यांतील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांत निर्माण झालेली भीषण परिस्थिती लक्षात घेता खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मदतीसाठी राज्य सरकारने दोन हजार ४४३ कोटी २२ लाख ७१ हजारांचा निधी वितरणास मान्यता दिली आहे. शासन निर्णय गुरुवारी (ता. २९) निर्गमित करण्यात आला.

त्याचा जिल्ह्यातील मालेगाव, येवला, सिन्नर या तालुक्यांना लाभ होणार आहे. मालेगाव तालुक्याला १०८ कोटी ९२ लाख ३३ हजार, तर सिन्नर तालुक्यासाठी ७५ कोटी ८१ लाख, येवला तालुक्यासाठी ६३ कोटी ३३ लाख इतका निधी वितरित केला आहे. दरम्यान, उर्वरित तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही मदतीची प्रतीक्षा लागून आहे.

मालेगावला दहा लाख शेतकऱ्यांना लाभ

मालेगाव तालुक्यातील १० लाख १९ हजार १२ शेतकऱ्यांना या दुष्काळ निधीचा लाभ मिळणार आहे. त्यात दोन हेक्टरच्या आतील एक लाख सहा हजार ७९५ इतक्या क्षेत्रावर, तर दोन ते तीन हेक्टरच्या सहा हजार ५६६ क्षेत्रावर दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे.

शासन निर्णयानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT