Silk agrowon
ॲग्रो विशेष

Silk Farming : मराठवाड्यातील २४ कोष उत्पादकांना ‘रेशीम रत्न पुरस्कार’

Silk Production :राज्य शासनाच्या वतीने मराठवाड्यातील २४ रेशीम कोष उत्पादकांना सोमवारी (ता. ७) अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात ‘रेशीम रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar: राज्य शासनाच्या वतीने मराठवाड्यातील २४ रेशीम कोष उत्पादकांना सोमवारी (ता. ७) अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात ‘रेशीम रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील प्रत्येकी तीन रेशीम कोष उत्पादकांचा यामध्ये समावेश आहे.

वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. नीलेश हेलोंडे पाटील, राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे, अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता महापात्रा, रेशीम संचालनालयाचे संचालक विनय मून, उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे, अमरावतीचे प्रादेशिक सहायक संचालक हेमंत लाडगाव, मराठवाड्याचे माजी उपसंचालक दिलीप हाके आदींच्या उपस्थितीत रेशीम रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ॲग्रो विशेष

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहादेव किसनराव ढाकणे, सदाशिव गोपीनाथ गीते, गोरख एकनाथ बढे, जालना जिल्ह्यातील सोमेश्वर दिगंबर वैद्य, जगन दौलत मुळे, भाऊसाहेब विठोबा वाघ, नांदेड जिल्ह्यातील विनोद रमेश पेंटे, गंगाधर माधव कदम, गजानन माधव कदम, लातूर जिल्ह्यातील शत्रुघ्न तुकाराम फड, सिद्धेश्वर भगवान कागले, सुनील मुरलीधर वडसकर, धाराशिव जिल्ह्यातील शिवलिंग बाबूराव सोनटक्के, महाबळेश्वर रामचंद्र डुकरे, अर्जुन रामचंद्र उमाप, बीड जिल्ह्यातील सर्जेराव नरहरी चव्हाण, पार्वती वैजनाथ भरडे, शिवाजी धर्मराज फाटे या रेशीम कोष उत्पादकांचा समावेश आहे.

एकरी दीड लाखापासून पाच लाखांपर्यंत उत्पन्न मिळवणारे हे शेतकरी असल्याची माहिती रेशीम विभागाकडून देण्यात आली. मराठवाड्यातील जिल्हा रेशीम विकास अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election 2024 : मतदानासाठी १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य

Sugarcane Crushing : ‘छत्रपती’चे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Millet Rate : दौंड बाजार समितीत बाजरीच्या दरात सुधारणा

Natural Industries Group : नॅचरल शुगर सात लाख टन ऊस गाळप करणार

Global Warming : तापमान वाढ कसे कमी होणार; याचा अंदाज नाही

SCROLL FOR NEXT