Animal Husbandry: आता रक्त संक्रमण म्हणजे एका प्राण्याचे रक्त दुसऱ्या प्राण्याला देणे. रक्त संक्रमण केवळ मनुष्यासाठी मर्यादित राहिली नाही, प्राण्यांमध्येसुद्धा आता रक्त संक्रमण यशस्वीरीत्या केले जाते. राज्यातील काही पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राण्यामधील रक्त संक्रमणाबाबत संशोधन झाले आहे..रक्त संक्रमण म्हणजे काय?सोप्या भाषेत रक्त संक्रमण म्हणजे रक्त देण्या-घेण्याची प्रक्रिया. माणसांमध्ये काही कारणास्तव रक्ताची कमतरता असते तेव्हा त्याला रक्त दिले जाते. अशाच प्रकारे प्राण्यांमध्येही रक्त संक्रमण केले जाते. हे रक्त संक्रमण ज्या त्या रक्त गटानुसार केले जाते. रक्त हे कनेक्टिव्ह पेशींचा संच असतो. ज्यामध्ये प्रामुख्याने रक्त पेशी आणि प्लाझ्मा असतात. या प्रक्रियेत एका प्राण्याचे रक्त (पूर्ण रक्त) किंवा रक्ताचे घटक जसे की लाल रक्त पेशी, प्लाझ्मा, प्लेटलेट दुसऱ्या रक्तक्षय झालेल्या प्राण्यास दिले जाते. सध्या श्वान, मांजर, गाय, बैल म्हैस यामध्ये रक्तसंक्रमण केले जाते. घोड्यामध्ये रक्तसंक्रमणाचे क्वचित प्रयोग झालेले आहेत..Animal Blood Transfusion: रक्त संक्रमण करतेवेळी जनावरांची काय काळजी घ्यावी? .प्राण्यांमधील रक्त संक्रमणावरील संशोधन मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर या ठिकाणी प्राण्यामधील रक्त संक्रमणाबाबत संशोधन झालेले आहे. १९९९ मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्राण्यासाठी देशातील पहिली रक्तपेढी स्थापन करण्यात आली. महाविद्यालयात ‘श्वानांच्या लाल रक्त पेशीचा जीवनकाल’ या महत्त्वाच्या विषयावर संशोधन झाले आहे. या लेखासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास चित्तर आणि मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पंकज हासे यांनी मार्गदर्शन केले आहे. .प्राण्यांमधील रक्तगटदुसऱ्या महायुद्धात रक्तगटाचा शोध लागला. त्यानंतर यशस्वीरीत्या रक्त देणे आणि घेण्याची प्रक्रिया होऊ लागली. असेच रक्तगट प्राण्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. प्राण्यामध्येही रक्तगट असतो. प्राण्यामध्ये त्याच्या प्रकारानुसार रक्तगट आणि त्यांची संख्या बदलत असते. मनुष्याप्रमाणे पूर्ण रक्तगट ओळखण्याची चाचणी अद्याप उपलब्ध नाही. तरी, श्वानामध्ये DEA १ आणि मांजरीमध्ये A, B आणि AB हे रक्तगट ओळखण्याची सोय उपलब्ध आहे. .क्र. प्राणी मुख्य रक्तगट रक्त गटाचे प्रकार१. गाय, म्हैस (११) A, B, C, F, J, L, M, R, S, T, Z.२. श्वान (९) DEA १.१, DEA १.२, ३, ४, ५, ६, ७, ८, डिएएल ॲन्टीजेन.३. मांजर (४) A, B, AB, मिक ॲन्टीजेन.४. घोडा (८) A, C, D, K, P, Q, U, T.५. शेळी (५) A, B, C, M, J.६. मेंढी (७) A, B, C,D, M, R, X..Animal Blood Bank: पशुधन, पाळीव प्राण्यांसाठीही रक्तपेढी.रक्त संक्रमणाची गरजमुळात माणसांना जेव्हा शरीरात काही कारणामुळे रक्त कमी पडते तेव्हा रक्त दिले जाते. तसेच रक्त संक्रमणाची गरज ज्या प्राण्याच्या रक्तामध्ये लाल रक्त पेशीचे प्रमाण आणि हिमोग्लोबिन कोणत्याही कारणाने कमी झाले असेल, तर रक्त संक्रमण करावे लागते. त्यामध्ये हिमोलायटिक आजार, गोचीडजन्य आजार, थायलेरिया, बबेसिया आजारांमध्ये रक्त संक्रमण केले जाते. याशिवाय श्वानांमध्ये बबेसिया, एर्हेल्षीया, आनाप्लाझ्मा अशा आजारांमध्ये रक्त दिले जाते. यासोबत लेप्टोस्पायरा, अपघात किंवा इतर कोणत्याही कारणामुळे होणारा रक्तस्राव, मूत्रपिंडाशी निगडित आजार, रक्त साकळण्याच्या प्रक्रियेतील दोष, रक्त क्षय (अनेमिया), भाजणे / जळणे, कावीळ सारखे यकृतासंबंधित आजार, म्हैसमध्ये स्फुरद घटकांच्या कमतरतेमुळे होणारी लाल लघवीमुळे आणि शस्त्रक्रियेदरम्यान होणाऱ्या रक्तस्रावामुळे प्राण्यांना रक्त संक्रमण केले जाते..पशुपालकांचा अनुभवमी ५ ते ६ वर्षांपू्र्वी गायीचे रक्त संक्रमण करुन घेतले होते. गोचीड तापामध्ये आमच्या गायीचा हिमोग्लोबीन कमी झाला होता. ती जागेवरून उठतच नव्हती. पण रक्त संक्रमणामुळे आमच्या गायीचा प्राण वाचला. त्यामुळे पशुधनामध्ये रक्त संक्रमण फार गरजेचे आहे. असे मत नेवासा येथील पशुपालक रविंद्र नवले यांनी दिले..रक्त संक्रमणाचे प्रकार रक्त संक्रमणात पूर्ण रक्त आणि रक्ताचे काही भाग देणे असे दोन प्रकार असतात. रक्ताच्या काही भागांमध्ये प्लाझ्मा, लाल रक्त पेशी, प्लेटलेट यापैकी एक देणे असा असतो. तर पूर्ण रक्त देण्याच्या प्रक्रियेत लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी, प्लेटलेट आणि प्लाझ्मा यांचा समावेश असतो. अनेक आजारामध्ये पूर्ण रक्त देणे फायद्याचे ठरते. पशूंना अपघात झाल्यानंतरचा होणारा रक्तस्राव भरून काढण्यासाठी पूर्ण रक्त देतात. तर प्रथिनांची कमतरता, यकृताशी संबंधित आजार, अतिसार होणे, भाजणे यामध्ये प्लाझ्मा संक्रमणाचा अधिक फायदा होतो. .याशिवाय प्लेटलेट हा रक्ताचा एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त साकळण्याच्या प्रक्रियेत याचा महत्त्वाचा सहभाग असतो.गोचीडजन्य आजारामुळे रक्तात प्लेटलेटची संख्या कमी होते. रक्त गोठण्याच्या संबंधाने होणारे विविध आजार, रक्त लवकर न गोठणे यासाठी प्लेटलेट संक्रमणाचा पर्याय निवडला जातो.तरी, पशूमध्ये हा पर्याय फार वापरला जात नाही. तसेच प्राण्यांच्या शरीरात लाल रक्त पेशींचे प्रमाण अचानक खालावले असल्यास लाल रक्त पेशी संक्रमण केले जाते..तज्ज्ञांचा सल्लारक्त संक्रमण हे जनावरांमध्ये फार महत्त्वाचे आहे. गोचीड ताप किंवा कावीळ या आजारांची तीव्रता वाढल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते. अशावेळी रक्तसंक्रमण फार गरजेचे असते, त्यामुळे जनावराचा प्राण वाचतो. परंतु योग्य मार्गदर्शनाखाली रक्त संक्रमण करणे आवश्यक असते, असे मत पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास चत्तर यांनी दिले..डॉ. विकास चित्तर, ९५७९९२१८३२पशुधन विकास अधिकारी, जि. अहिल्यानगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.