Team Agrowon
कोष काढणी झाल्यानंतर संगोपनगृहाची साफ सफाई, निर्जंतुकीकरण या बाबींवर विशेष भर दिला जातो. दर्जेदार रेशीम कोष उत्पादनासाठी तुतीची चांगल्या प्रतीची पाने उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असते.
बागेची छाटणी करून नांगरणी, वखरणीची कामे केली जातात. त्यानंतर रासायनिक खतांच्या मात्रा देऊन पाणी दिले जाते. छाटणी केल्यानंतर दीड महिन्यात तुती पाने तयार होतात.
त्यानंतर बाल्यकीटक आणून पुढील रेशीम कोष उत्पादनाची बॅच सुरु केली जाते. बाल्य रेशीम किटकांची विशेष काळजी घेतली जाते.
सुरुवातीची काही वर्षे रेशीम कीटकांच्या बायव्होल्टाईन जातीच्या १०० अंडीपुंजाच्या प्रत्येक बॅचपासून ८० ते ९० किलो कोष उत्पादन मिळत होते.
एका वर्षात साधारणपणे १५० अंडीपुजांच्या बॅचपासून सरासरी १२५ ते १५० किलो उत्पादन मिळते.
संपूर्ण कोष काढणी पूर्ण झाल्यानंतर शेडचे निर्जंतुकीकरण करावे.
नवीन बॅच नियोजनानुसार तुती बागेतील कामांवर भर द्यावा. मशागतीची कामे, छाटणी, खताची मात्रा, सिंचन यावरही द्यावा.
तापमानात वाढ होत असल्याने संगोपनगृहातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी छतावर मिनी स्प्रिंकलर लावावे.