Ustod Kamgar News: कोल्हापूर ऊसपट्ट्यात ऊस तोडणीचे काम वेगाने सुरु आहे. अनेक ठिकाणी ऊसतोड कामगारांची कुटुंबे जिथे जागा मिळेल तिथे झोपड्या बांधून राहिली आहे. काही ठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी आणि शौचालय सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होते. अशा कामगारांना साखर कारखान्यांनी चांगल्या सुविधा देणे आता अनिवार्य आहे. या सुविधांबाबतची तपासणी विशेष पथकांद्वारे करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. ज्या कारखान्यांनी आवश्यक सुविधा पुरवल्या नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. .सुमोटो याचिकेअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड कामगारांसाठी चांगल्या सुविधा देणे आता अनिवार्य ठरले आहे. याबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासन समिती, समाजकल्याण, आरोग्य, पोलीस, महिला आणि बाल विकास, शिक्षण, पुरवठा, कामगार, परिवहन, साखर आदी विभागांचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले होते..Sugarcane Rate Protest: कर्नाटकातील मुधोळमध्ये ऊसदर आंदोलनाचा भडका.यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी कामगारांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधांबाबत उपस्थित असलेल्या सर्वांना सूचना केल्या. ते म्हणाले, समितीमार्फत तयार करण्यात आलेल्या १४ नमुन्यांमध्ये ऊसतोड कामगारांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ, ० ते ६ वयोगटातील मुलांसाठी तसेच गरोदर मातांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधा, रुग्णवाहिका, मुलांचे शिक्षण, पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय सुविधा, पुरेशा प्रकाश व्यवस्था, लैंगिक शोषणाविरुद्ध कार्यरत समितीचे कामकाज, जनावरांसाठी आवश्यक लसीकरण आदी सर्व बाबींची माहिती तत्काळ सादर करावी. जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांच्या राहण्याच्या ठिकाणांचे नकाशे तयार करा, महिला अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करून त्या सतत सक्रिय ठेवा, बालसंस्कार गृहांची स्थापना करा. एकही मूल शाळेबाह्य राहू नये, ही जबाबदारी पूर्ण करावी. याबाबत शिक्षण विभागाने सतत पाठपुरावा करावा..Sugarcane Farming: सलग पाचव्या वर्षी उसाचे उत्पादन एकरी शंभर टनांवर.कारखान्यांनी या सुविधांबाबत नाविन्यपूर्ण कल्पना राबवून चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. या केलेल्या कामांबाबत समिती पथकांद्वारे तपासणी करून कामांची शहानिशा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.