Water Tanker  Agrowon
ॲग्रो विशेष

Nasik Water Shortage : नाशिक जिल्ह्यात तहान भागविण्यासाठी २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water Tanker : फेब्रुवारीअखेर पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणू लागल्या. तर यंदा तापमानात झालेली वाढ व जलस्रोत आटल्याने पाण्याची स्थिती बिकट होत आहे. पारा ४० अंश पार गेल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक : फेब्रुवारीअखेर पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणू लागल्या. तर यंदा तापमानात झालेली वाढ व जलस्रोत आटल्याने पाण्याची स्थिती बिकट होत आहे. पारा ४० अंश पार गेल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पाण्याची टंचाई जाणवत असून जिल्ह्यात १५ पैकी ७ तालुक्यात २२ गावे व ३५ वाड्यांसाठी २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला जात आहे.

तापमानात झपाट्याने वाढ झाल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत आहे. तर अनेक भागात भूजल पातळी कमालीची घटली आहे. यामध्ये अनेक भागात पाणीपुरवठा योजना नसल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमानाचा तालुका असलेल्या इगतपुरी तालुक्यात सुरवातीला १ टँकर सुरू झाला.

तर पूर्व भागात येवला तालुक्यात सर्वाधिक ९ टँकर सुरू आहेत. सुरगाणा व पेठ तालुक्यात प्रत्येकी १, सिन्नर तालुक्यातील चांदवड तालुक्यात २ तर सोमवार (ता. १४)पासून मालेगाव तालुक्यात ५ टँकर सुरू झाले आहेत. उन्हाच्या चटक्यामुळे जिवाची लाही लाही होत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे स्रोत आटले तर ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा सामना करताना अनेक भागात डोक्यावर हांडे दिसून येत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होती. मालेगाव तालुक्यात ५ तर पेठ, सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी १ अशा ७ विहरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत.

टँकरची संख्या वाढणार

येवला तालुक्यात पर्जन्यमान कमी असल्याने फेब्रुवारी महिन्यातच टँकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर एक महिना उशिराने एप्रिल महिन्यात येवला तालुक्यात टँकर सुरू झाले आहे. उष्णतेचा दाह वाढत असताना पाण्याची उपलब्धता तुलनेने कमी आहे. त्यातच माणसांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सामोर आहे. त्यामुळे जसा चटका वाढत जाईल तशी पाण्याची मागणी व टँकरची संख्या वाढत जाईल असे चित्र आहे. मागील वर्षी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती समोर होती. दिवाळी संपताच अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.

तालुका गावे/वाडी टँकर संख्या मंजूर फेऱ्या

येवला २३ ९ १२

मालेगाव १५ ५ १२

सिन्नर ८ ३

चांदवड २ २ २

इगतपुरी ७ १ २

पेठ १ १ १

सुरगाणा १ १ २

एकूण ५७ २२ ३४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT